IPL 2026 मध्ये शून्य विकेट… तरीही टीम इंडियात थेट एन्ट्री! सिलेक्टर्सच्या ‘या’ निर्णयाने सगळे

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली 23 जुलै रोजी भारतीय संघ हरारे येथे आपला पहिला सामना खेळणार आहे. या दौऱ्यासाठी संघात आयपीएल (IPL 2026) मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अशोक शर्मा आणि यश ठाकूर यांसारख्या युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तसेच, रिंकू सिंगचेही संघात पुनरागमन झाले आहे. पण या सगळ्यात एका अशा खेळाडूची चर्चा रंगली आहे, ज्याला तब्बल 21 महिन्यांनंतर भारतीय संघात परत बोलावण्यात आले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज मयंक यादव आहे.

मयंक यादवची निवड वादग्रस्त का?

मयंक यादवच्या निवडीवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयपीएलमध्ये आपल्या तुफानी वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा मयंक गेल्या काही काळापासून दुखापतींमुळे त्रस्त होता. आयपीएल 2026 मधील त्याची कामगिरी पाहिली, तर त्याची निवड कोणत्या आधारावर झाली? हा एक मोठा प्रश्न आहे.मयंक यादव लखनऊ संघातून आयपीएल 2026 या हंगामात दुखापतीमुळे केवळ 4 सामने खेळू शकला. या 4 सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट (0 विकेट) मिळवता आली नाही. विकेट न मिळण्यासोबतच तो अत्यंत महागडा ठरला होता.

दुसरीकडे, अशोक शर्मा (6 सामन्यांत 6 विकेट) आणि यश ठाकूर (1 सामन्यात 2 विकेट) यांना आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे फळ मिळाले आहे. अशा परिस्थितीत मयंक यादवला संघात स्थान मिळणे म्हणजे निवड समिती आणि संघ व्यवस्थापन त्याच्यावर मेहरबान असल्याचे बोलले जात आहे.

‘या’ कारणामुळे मयंकला मिळाली संधी?

मयंक यादवच्या अचानक झालेल्या पुनरागमनामागे खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट हे एक मुख्य कारण असल्याचे समजते. झिम्बाब्वेविरुद्धच्या या मालिकेसाठी हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांसारख्या प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले नसले तरी, वर्कलोड कमी करण्यासाठीच त्यांना विश्रांती दिल्याचे स्पष्ट आहे. याच प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे मयंक यादवसाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.

हे ही वाचा –

IND vs ENG 4th T20I : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 सामना आज! हाय-व्होल्टेज ड्रामा, सस्पेन्स अन् बरंच काही… खिसा रिकामा न करता Live मॅचचा आनंद कुठे घ्यायचा? वाचा एका क्लिकवर

Comments are closed.