सिंपल कुर्तीसाठी डिझायनर नेकलाईन





ऑफिस किंवा कॉलेजला जाणाऱ्या तरुणींसाठी कुर्ता सिलेक्शन महत्वाचे असते. कारण तुमच्या लूकवर कोणत्या रंगाची कुर्ती खुलून दिसते हे जितकं महत्वाचं तितकचं त्या कुर्तीची नेकलाईनही महत्वाची असते. यामुळे ऑफिस वेयर साठी शॉर्ट किंवा लॉँग कुर्ते निवडताना त्यांची नेकलाईनही बघावी. त्यातही जर तुम्ही कुर्ता शिवून घेणार असाल तर मनासारखी नेकलाईन तुम्ही शिवून घेऊ शकता. त्यासाठी कोणते ऑपश्न आहेत ते बघूया.

कटवर्क ड्रॉप नेकलाइन

जर तुम्हाला कुर्त्याला हटके पण आकर्षक लूक द्यायचा असेल तर ड्रॉप नेकलाईन हे बेस्ट ऑपश्न आहे. यात नेकलाईनला लहान कट्स डिझाईन असतात. त्यावर मोती आणि नागमोडी लेसची डिझाईन करता येते. त्यामुळे कुर्ता आकर्षक दिसतो. ऑफिस, कॉलेजसाठी डेलीवेयर म्हणून ही कुर्ती चांगल ऑपश्न आहे.

फ्रील नेकलाईन

जर कुर्ता वी नेकचा असेल तर त्याच्या बॉर्डरवर फ्रीलचे वर्क शोभून दिसते. शिवाय हा कुर्ता एलिंगट लूक देतो. जीन्स किंवा पलाझोवर असा कुर्ता छान दिसतो.

पाईपिंग व्ही नेक
जर तुम्हाला सिंपल पण स्टायलिश लूक हवा असेल तर वी नेकलाईनच्या बॉर्डरवर वेगळ्या रंगाची पाईपिंग किंवा लेस लावू शकता. त्यामुळे कुर्ता आकर्षक दिसतो. कॉटन, प्रिंटेड आमि रोजच्या वापरासाठी असे कुर्ते बेस्ट असतात.

फुलांचा लेस गुडघा मान
जर तुम्हाला फेमिनीन लूक हवा असेल तर फ्लोरल लेस असलेले वी नेकलाईन नक्की ट्राय करा. गळ्याजवळ लहान लहान फुलांची लेस खूप छान लूक देते. पार्टी, सण, किंवा लहान सहान इवेंटस मद्ये हा लूक हटके दिसतो. यावर सिंपल ज्वेलरीही ट्राय करू शकता.



Comments are closed.