खाण्यापिण्याच्या या रोजच्या सवयी वाढवतात तुमचा स्ट्रेस
स्ट्रेस शरीरासाठी घातक असतो. या स्ट्रेसचा केवळ मेंदूवरचं नाही तर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. सध्याच्या धावत्या लाईफस्टाईलमुळे तरूणांमध्ये तर तणाव हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे. अभ्यासाचं प्रेशर, करिअरचं टेंशन, ऑफिसची कामं आणि कौटूंबिक समस्या यांमुळे स्ट्रेस वाढत आहे. इतकंच काय तर खाण्यापिण्याच्या काही सवयींमुळे सुद्धा स्ट्रेस वाढतोय. नुकतंच न्यूट्रिशनिस्ट यांनी खाण्यापिण्याच्या कोणत्या रोजच्या सवयी तुमचा स्ट्रेस वाढवतात या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तरपणे
कमी कार्ब आहार –
हल्ली कमी कार्बोहायड्रेट्स असलेला आहार जास्त प्रमाणात घेतला जातो. यामध्ये बिस्किट, चॉकलेट, पॅकेट फूड यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. अशा पदार्थांमुळे संतुलित पोषण शरीराला मिळत नाही आणि स्ट्रेस वाढतो.
नाश्ता टाळणं –
नाश्ता न केल्यास शरीरातील बायोलॉजिकल क्लॉकचं चक्र बाधित होतं आणि स्ट्रेसची लेव्हल वाढते. त्यामुळे सकाळी फक्त चहा-कॉफी न घेता हेल्दी नाश्ता अवश्य करावा.
सीझनल फळं टाळणं –
शुगर वाढीच्या भीतीने अनेकजण सीझनल फळं खाणं टाळतात. पण तज्ज्ञांच्या मते ही सर्वांत मोठी चूक आहे. केळी, आंबा या फळांमधून प्रोबायोटिक्स मिळतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. आतड्यांचे आरोग्य उत्तम राहिले तर पोटाचे आरोग्य उत्तम असते. ज्यामुळे मूड उत्तम राहतो आणि स्ट्रेस जाणवता नाही.
अतिसाखर खाणं –
जास्त साखर किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि कमी होते. या चढ-उतारामुळे मूड स्वींग्स होतात आणि थकवा जाणवते.
हिरव्या पालेभाज्या न खाणं –
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि फायबर नसल्यास पचनक्रिया मंदावते. पोटाचा आणि मेंदूचा थेट संबंध असल्याने खराब पचनसंस्थेमुळे स्ट्रेस वाढू शकतो.
तणाव कमी करण्यासाठी, आहारात अंडी, मासे किंवा डाळी, बदाम, अक्रोड आणि ग्रीन टी यांसारख्या पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
हेही वाचा – पावसाळ्यात मका खाण्याचे फायदे काय? एका क्लिकवर जाणून घ्या माहिती
Comments are closed.