छत्रपती संभाजीनगरासह तीन जिल्ह्यांतील 16 तरुणांना घेतले ताब्यात, शहजाद भट्टीची पाळेमुळे शोधण्यासाठी ATSने कंबर कसली
शहजाद भट्टी या पाकिस्तानी गँगस्टरशी संबंधित असलेल्या तीन जिल्ह्यातील 16 तरुणांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. भट्टीशी संबंध असल्याचा संशयावरून छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यात ही मोठी शोध मोहीम राबवली. यापूर्वी 6 जुलै रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राज्यात अशा प्रकारे मोहीम राबवली होता. सोशल मिडिया नेटवर्कच्या माध्यमातून या भट्टी गँगच्या संपर्कात असलेल्या या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाकिस्तानात राहून दुबईसह इतर देशांमध्ये गुन्हेगारी टोळी निर्माण करणार्या शहजाद भट्टीचे आयएसआयशी संबंध असल्याचे समोर आले आहे. एकेकाळी ‘333’ या नावाने सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या शहजाद भट्टीला हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांनी त्याला सीमापार दहशतवादी गट, अवैध शस्त्र तस्करी आणि हिंदुस्थानातील हत्या व बॉम्बस्फोटांसाठी कट्टरपंथी तरुणांच्या भरतीमागील सूत्रधार म्हणून ओळखले जातो.
देशात भट्टीचे नेटवर्क वाढत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो बेरोजगार तरुणांना आपले लक्ष्य बनवून त्याच्या कट्टरपंथी गँगमध्ये सहभागी करून घेतो. या तरुणांच्या माध्यमातून तो देशभरात आपले नेटवर्क उभे करत आहे. भट्टीच्या सोशल मीडियाला फॉलो करणार्यांवर एटीएसचे पथक पाळतीवर होते. गुरुवारी रात्री अचानक वेगवेगळे पथक तयार करून या पथकांनी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यात छापेमारी केली. यात जवळपास १५ ते १६ तरुणांना ताब्या घेतले आहे. चौकशी करून त्यांना नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Comments are closed.