राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण

किरण लहामटे: राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांची आणि नातेवाईकांची दादागिरी थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे (NCP Ajit Pawar Faction) आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate) यांचा स्वीय सहाय्यक आणि चुलत भाऊ मुकुंद लहामटे (Mukund Lahamte) याने एका तरुणाला भरबाजारपेठेत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना राजूर येथील बाजारपेठेत घडली असून मारहाणीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Kiran Lahamate: भरबाजारात फिल्मी स्टाईल मारहाण

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना 6 जुलै रोजी घडली आहे. राजूर बाजारपेठेत एका किरकोळ कारणावरून मुकुंद लहामटे आणि संबंधित तरुणाचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आमदाराच्या भावाने कायदा हातात घेत संबंधित तरुणाला रस्त्यावर ‘फिल्मी स्टाईल’ बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. भरबाजारात सुरू असलेल्या या गुंडगिरीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Kiran Lahamate: अद्याप गुन्हा दाखल नाही

या घटनेला 4 दिवस उलटून गेले असून मारहाणीचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, भरबाजारपेठेत एका तरुणाला अशा प्रकारे बेदम मारहाण झालेली असतानाही अद्याप राजूर पोलीस ठाण्यात (Rajur Police Station) याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा भाऊ असल्यानेच पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आमदार लहामटे हे सध्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत आहेत. या प्रकरणी अद्याप त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Moshi Building Collapse: आत अडकलेली माणसं ‘आई-आई’ ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप

Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना

Comments are closed.