शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, ना

नाशिक क्राईम न्यूज : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कळवण (Kalwan) तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. येथील मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने (Minor Student) बाळाला जन्म दिल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: नात्यातीलच मुलाने नको ते केलं

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अत्याचारामुळे ही विद्यार्थिनी गरोदर राहिली होती. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात (Kalwan Police Station) पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

Nashik Crime News: प्रशासनाचा खुलासा; घटना सुट्ट्यांच्या काळात गावी घडली

या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला कमालीची गुप्तता पाळली होती. दरम्यान, हा प्रकार आश्रमशाळेच्या आवारात घडलेला नाही, असा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनी जेव्हा सुट्ट्यांवर आपल्या गावी गेलेली होती, त्याच काळात हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संबंधित विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती नाशिकचे आदिवासी विकास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली आहे.

मात्र, आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. आश्रम शाळेत दैनदिन आरोग्य तपासणी करताना एवढी मोठी बाब लक्षात का आली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच; ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

Nagpur Crime: शिक्षकाने वर्गात उठाबशा काढायला लावल्या, विद्यार्थ्याने गळ्याला दोर लावला, हायकोर्टाकडून शिक्षकांची निर्दोष सुटका

Comments are closed.