नातवासाठी थेट किचनमध्ये! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा अनोखा अंदाज; व्हिडिओ तुफान व्हायरल

तेलंगणा – आजोबा आणि नातवाचे नाते खुप सुंदर असते त्याला नात्याचे शब्दात वर्णन करणे कमी पडते… आजोबा हे नातवा सोबत आपले बालपण जगत असतात .. नातू जे हट्ट करतो ते पुर्ण करत असतात.. ते आजोबा सर्वसामान्य असो किंवा व्हिआयपी असो , असेच काही सुंदर नाते तेलंगणामध्ये मुंख्यमंत्र्यांच्या घरी अनुभवाला मिळाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा एक आगळावेगळा आणि भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.. ज्यामध्ये आपल्या नातावासोबत चक्क किचनमध्ये पुऱ्या तळत आहेत… त्यांचा हा व्हीडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे..

राजकारणातील व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मुख्यमंत्री आपल्या लाडक्या नातवासाठी स्वयंपाकघरात स्वतः पुऱ्या बनवताना दिसत आहेत.समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रेवंत रेड्डी अत्यंत साधेपणाने स्वयंपाक करताना दिसत असून, नातवासाठी प्रेमाने पुऱ्या तयार करतानाचे हे क्षण अनेकांच्या पसंतीस उतरले आहेत.

मुख्यमंत्री म्हणून जबाबदाऱ्या सांभाळतानाच कुटुंबासाठी वेळ देणारी त्यांची ही भूमिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.अनेकांनी रेवंत रेड्डी यांच्या साधेपणाचे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे कौतुक केले आहे.

Comments are closed.