गुरुग्राम चकमकीत चार शूटर्स ठार

वृत्तसंस्था/ गुरुग्राम

हरियाणातील गुरुग्राममध्ये गुरुवारी रात्री उशिराने पोलीस आणि दीपक नंदाल टोळीच्या सदस्यांमध्ये चकमक झाली. यात दीपक नंदाल टोळीचे चार शूटर ठार झाले. हे गँगस्टर एसजीटी विद्यापीठाच्या संस्थापकाच्या मुलाच्या घरी खंडणी मागण्यासाठी आणि गोळीबार करण्यासाठी आले होते. मात्र, पोलिसांनी सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार केल्याने चकमक झाली. पोलिसांना जवळ येताना पाहून प्रत्युत्तरादाखल आरोपींनी गोळीबार केल्याने तीन पोलीस अधिकारी जखमी झाले. मात्र, प्रत्युत्तरादाखल गुरुग्राम पोलिसांनी चार आरोपींना ठार केले. शुक्रवारी सकाळी या पोलीस चकमकीबद्दल एसीपी सदर धर्मवीर सिंग यांनी माध्यमांना माहिती दिली.

Comments are closed.