12 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोलमिश्रित औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय नाहीत
12 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोलमिश्रित औषधांची खुली विक्री यापुढे करता येणार नाही. ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत. केंद्र सरकारने ड्रग्स नियम, 1945मध्ये बदल केला असून नवे नियम जारी केले आहेत. बाजारात खुली विक्री केल्या जाणाऱया कफ सिरप आणि टॉनिकमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अनेक जण केवळ नशेसाठी ही औषधे घेतात. हा दुरुपयोग रोखण्यासाठी सरकारने नवा नियम लागू केला आहे. नवा नियम 30 मिलीलीटरपेक्षा जास्त क्षमतेच्या बॉटलसाठी राहणार आहे. सरकारने औषध विक्री करणाऱया दुकानांसाठीदेखील काही निर्देश जारी केले आहेत. अशा औषधांच्या विक्रीची वेगळ्या रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी लागणार आहे. वेगळी नोंद न आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द होऊ शकतो.
Comments are closed.