जेएनपीए विकसित करणार 62 एकर क्षेत्रात 50 हजार क्षमतेचे साठवणूक कंटेनर यार्ड
>> मधुकर ठाकूर
जेएनपीएने जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांसह 62 एकर क्षेत्रात वीसफुटी 50 हजार कंटेनर साठवणूक क्षमतेचे अत्याधुनिक एम्टी कंटेनर यार्ड विकसित करण्याची घोषणा केली आहे. बंदराच्या टाऊनशिपच्या फुंडे रोडवरील प्लॉट नं. 204 मध्ये 3 किमी अंतरावर तीन टप्प्यांत विकसित करण्यात येणाऱ्या 2027 पर्यंतच्या मुदतीत कार्यान्वित होणार आहेत. अत्याधुनिक एम्टी कंटेनर विकसित करण्यासाठी 2580 कोटी खर्च अपेक्षित आहे.
या एम्टी कंटेनर यार्ड विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरील सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे जहाजवाहतूक पंपन्या व त्यांच्या कंटेनर उपकरणांचे अधिक कार्यक्षम व्यवस्थापन सहजसुलभ जलदगतीने करता येणार आहे. तसेच बंदरे, कंटेनर टर्मिनल्स, कंटेनर फ्रेट स्टेशन, विशेष आर्थिक क्षेत्रे, फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन आणि परिवहन सेवा पुरवठादार यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी जेएनपीएने एम्टी यार्ड विकसित करण्याची घोषणा केली आहे. प्रस्तावित एम्टी कंटेनर यार्डची अनेक व प्रमुख वैशिष्टय़े आहेत. यामध्ये एम्टी कंटेनर्सची साठवण, कंटेनर देखभाल व दुरुस्ती, प्री-ट्रिप इन्स्पेक्शन, कंटेनर सर्व्हे व तपासणीसह जागतिक स्तरावरील सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रस्तावित एम्टी कंटेनर यार्ड 24 तास कार्यरत असणार आहे.
बंदराच्या तीन किमी अंतरावर विकसित करण्यात येणाऱ्या एम्टी कंटेनर यार्ड पहिल्या टप्प्यात सुमारे 20 एकर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. हे पुढील 15 ते 20 दिवसांत ते कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी 2027 पर्यंत आणखी 20 एकर क्षेत्र, तिसऱ्या टप्प्यात उर्वरित 21.7 एकर क्षेत्रात मे 2027 पर्यंत विकसित करून एपूण 62 एकरांचे एम्टी कंटेनर यार्ड पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.
Comments are closed.