3 सामने अन् गेम ओव्हर! कर्णधार श्रेयस अय्यरचा धक्कादायक निर्णय; 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला
इंग्लंड विरुद्ध भारत, 5वी T20I प्लेइंग इलेव्हन : इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका आधीच गमावलेल्या टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात एक असा धक्कादायक निर्णय घेतला, ज्याने सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये दोन मोठे बदल केले. संघ व्यवस्थापनाने अनुभवी संजू सॅमसनला पुन्हा एकदा नशीब आजमावण्याची संधी दिली आहे, पण त्यासाठी अवघ्या 3 सामन्यांनंतर युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीला थेट संघातून डच्चू देण्यात आला. वैभवशिवाय संघात आणखी एक बदल करण्यात आला असून, अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेचेही प्लेइंग ११ मध्ये पुनरागमन झाले आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी सूर्यांशला संघात स्थान मिळाले आहे.
सादर करत आहे #TeamIndia5️⃣व्या आणि अंतिम T20I साठी प्लेइंग इलेव्हन 🙌
अपडेट्स ▶️ https://t.co/7mo5osv0MW#ENGvIND pic.twitter.com/uSVKJB5raY
— BCCI (@BCCI) 11 जुलै 2026
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. साऊदॅम्प्टन येथील खेळपट्टी आणि हवामान लक्षात घेता, तसेच मागील काही सामन्यांमधील गोलंदाजांची कामगिरी पाहता भारताने हा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी भारतीय संघाला मैदानावर पोहोचण्यासाठी काहीसा उशीर झाला होता, परंतु कर्णधार अय्यरने स्पष्ट केले की, यामुळे संघाच्या मानसिकतेवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि संघ या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
भारतीय संघर्षात दोन मोठे बदल
भविष्यातील रणनीती आणि योग्य समीकरणांचा शोध घेण्यासाठी भारतीय संघाने आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. संजू सॅमसनचे संघात पुनरागमन झाले असून, त्याला सूर्यवंशीच्या जागी संधी देण्यात आली आहे. सूर्यांश शेडगे या युवा खेळाडूला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
दोन्ही संघांची अंतिम प्लेइंग इलेव्हन :
भारतीय संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड संघ : फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टिरक्षक), हॅरी ब्रूक (कर्ंधर), जेकब बेथेल, टॉम बंटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टोंग.
कर्णधार श्रेयस अय्यरचा खेळाडूंना कानमंत्र
“मला फक्त एवढंच वाटतं की खेळाडूंनी निकालाची चिंता न करता मैदानावर आपले 100 टक्के योगदान द्यावे. घाईगडबड न करता, शांत राहून वर्तमानात जगावे आणि स्वतःची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा.”
हे ही वाचा –
Comments are closed.