बंगालमध्ये यूसीसीसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना
9 सदस्यीय समिती ठरवणार समान नागरी संहितेची दिशा
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल सरकारने समान नागरी संहिता (युसीसी) तयार करण्यासाठी आणि लागू करण्यासाठी 9 सदस्यीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई भूषवतील. राज्य सरकार ऑगस्टमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा अधिवेशनात युसीसी विधेयक सादर करण्याची योजना आखत आहे. तथापि, सरकारने आदिवासी (स्थानिक) समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. यासंबंधी आता तज्ञ समिती सदस्यांकडून प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे समान नागरी कायद्याची दिशा ठरवली जाणार आहे.
Comments are closed.