टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद

IND VS ENG ODI मालिका वेळापत्रक मराठी बातम्या : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका आता संपली आहे. या मालिकेत टीम इंडियाला 0-4 अशा दारूण पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, आता या पराभवाला मागे सारत दोन्ही संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. या मालिकेत दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. विराट आणि रोहितला खेळताना पाहणे प्रत्येक क्रिकेट चाहत्यासाठी खास असते, कारण हे दोन्ही खेळाडू आता प्रामुख्याने वनडे फॉरमॅटमध्येच खेळताना दिसतात. चला तर मग जाणून घेऊया भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे संपूर्ण शेड्युल आणि दोन्ही संघ…

टी-20 मालिकेत टीम इंडियाचा व्हाईटवॉश

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली गेली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता. परंतु, त्यानंतर खेळवल्या गेलेल्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने भारताचा 0-4 असा व्हाईटवॉश केला. या लाजीरवाण्या पराभवानंतर आता भारतीय संघाची नजर आगामी वनडे मालिका जिंकण्यावर असेल.

14 जुलैपासून रोहित-विराट मैदानात उतरणार

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका 14 जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेद्वारे विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात परतणार आहेत. यापूर्वी भारताने अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळली होती, ज्यामध्ये रोहित खेळला होता, पण फिटनेसच्या कारणास्तव विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आयपीएल 2026 नंतर विराट कोहली पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ॲक्शनमध्ये दिसणार आहे.

IND vs ENG वनडे मालिकेचे संपूर्ण शेड्युल (Schedule)

14 जुलै – पहिला वनडे – दुपारी 3:30 वा. बर्मिंगहॅम
16 जुलै – दुसरा वनडे – संध्याकाळी 5:30 वा. कार्डिफ
19 जुलै – तिसरा वनडे – दुपारी 3:30 वा. लॉर्ड्स (लंडन)

वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ (Squads)

भारतीय क्रिकेट संघटना: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, शिवम दुबे.

इंग्लंड क्रिकेट संघ : हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, विल जॅक्स, रेहान अहमद, गुस ऍटकिन्सन, सॅम करन, लियाम डॉसन, टॉम बंटन, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, आदिल रशीद, जोश टोंग.

हे ही वाचा –

FIFA World Cup star Jayden Adams Death : FIFA वर्ल्डकप गाजवला, घरी परतला… पण फुटबॉलपटूवर काळाचा घाला! 25 व्या वर्षी अचानक निधन; सगळेच हादरले, मृत्यूचं कारणही सापडेना!

Comments are closed.