इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी टीम इंडियात मोठे बदल; प्रिन्स यादव आणि रवी बिश्नोईला लॉटरी, नुकतेच दुखापतीतून सावरलेले दोन खेळाडू बाहेर
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि फिरकीपटून रवी बिश्नोईला संघात स्थान देण्यात आलं आहे. निवड समितीने बदली खेळाडू म्हणून या दोघांच्या नावाची घोषणा केली आहे. दुखापतीतून सावरून वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकीपटून वरुण चक्रवर्ती नुकतेच संघात पुनरागमन केले होते. मात्र, हे दोघेही अजून दुखापतीतून 100 टक्के सावरले नाहीत. त्यामुळे हर्षित राणाच्या जागी प्रिन्स यादव आणि वरुण चक्रवर्तीच्या जागी रवी बिश्नोईला संघात स्थान देण्यात आलं आहे.
हर्षितच्या उजव्या पायाला ‘ग्रेड १’ ची, तर वरुणच्या डाव्या पायाला गंभीर ‘ग्रेड २’ ची हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. या दोघांनाही आता पुढील उपचारासाठी आणि पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मध्ये पाठवण्यात आले आहे. या दुखापतींमुळे हर्षित इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला मुकणार असून, वरुण झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. प्रिन्स यादवने नुकतीच आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी 16 बळी घेत चमकदार कामगिरी केली होती, तर रवी बिश्नोईने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 11 बळी घेतले होते. या दोन्ही खेळाडूंना आता संघात मिळालेल्या या संधीचे सोने करण्याचे आव्हान असेल.
सर्वेश कुशारेला ऐतिहासिक कांस्यपदक! डायमंड लीगमध्ये इतिहास घडवला
महत्त्वाचे म्हणजे, हर्षित आणि वरुण हे दोन्ही खेळाडू नुकतेच दुखापतींमधून सावरून संघात परतले होते. आयपीएल दरम्यान वरुण चक्रवर्तीच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाले होते, ज्यामुळे त्याला अफगाणिस्तान आणि आयर्लंड दौऱ्याला मुकावे लागले होते. दुसरीकडे, हर्षित राणाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात गुडघ्याची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला घरच्या मैदानावर झालेल्या टी-20 विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले होते. शस्त्रक्रियेनंतर त्याने संघात पुनरागमन केले होते, मात्र पुन्हा एकदा झालेल्या या नव्या दुखापतींमुळे या दोन्ही खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत.
🚨 बातम्या 🚨
जखमी हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांच्या जागी प्रिन्स यादव आणि रवी बिश्नोई यांची निवड करण्यात आली आहे. #TeamIndiaच्या पथकांसाठी #ENGvIND एकदिवसीय आणि #ZIMvIND T20I, अनुक्रमे.
अधिक तपशील 🔽https://t.co/xOPGYDaugn
— BCCI (@BCCI) 12 जुलै 2026
Comments are closed.