सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत; राऊतांचा प्रहार

संजय राऊत कुणाला फॉलो करत नाहीत. Autodesk_new सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला आज 14-15 दिवस झाले असून शरीराने कोसळून पडले आहेत, तरुणांनी रस्त्यावर यावं,  सरकारला सोनम वांगचूक यांचा बळी हवाय. त्यांना लढणारे लोक नको आहेत. ज्यांना तुरुंगात टाकता येत नाही, त्यांना ते अशा प्रकारे मारू इच्छित आहेत. या सरकारची नियत हीच असल्याचा घणाघाती प्रहार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. नीट पेपर घोटाळ्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणासाठी चालले आहेत. मात्र, मोदी सरकारकडून  कोणत्याही प्रकारची आतापर्यंत हालचाल करण्यात आलेली नाही. 20 जूनपासून काॅकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरु केलं असून अभिजित दीपके सुद्धा आंदोलनात आहेत.

हे सरकार काय करतं?

राऊत यांनी सांगितले की, अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, असा एकही दिवस गेला नाही मनमोहन सिंग सरकारचा की मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली डेलिगेशन जाऊन अण्णांना भेटलं नाही. हे सरकार काय करतं? सोनम वांगचूक हा साधा माणूस नसल्याचे ते म्हणाले. संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवरून हल्लाबोल केला. ते म्हणाले, कॅगचे ताशेरे मारल्याने मग कोणीतरी कोर्टात जाईल. कोर्ट त्याला स्थगिती देईल, या माध्यमातून ती योजना बंद केली पाहिजे. निवडणुकीत 2100 रुपये करण्याचं  आश्वासन होतं, तर करा ना! अडवलं कोणी? करत का नाही? असा सवाल त्यांनी केला.

शरद पवार दिवसेंदिवस निष्पक्ष होत चालले आहेत

शरद पवारांवार बोलताना ते म्हणाले की, शरद पवार दिवसेंदिवस निष्पक्ष होत चालले आहेत. पवार साहेब सगळ्यांचे आहेत, ते तटस्थ भूमिका सध्या बजावता आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. पवार साहेब महाविकास आघाडीला कधीही सोडून वेगळा विचार करणार नाहीत. त्यांची विचारधारा ही वेगळ्या पद्धतीची आहे. अख्खा महाराष्ट्र सोबत घेऊन चालले असल्याचे ते म्हणाले.

कशाला चांगल्या माणसाला अडचणीत आणताय?

राऊत यांनी सांगितले की, फडणवीस दिल्लीत गेले तर इथे बावनकुळे मुख्यमंत्री होतील, मी परत सांगतो. कशाला त्यांना अडचणीत आणताय? चांगला माणूस आहे तो. कशाला चांगल्या माणसाला अडचणीत आणता? असं अडचणीत आणू नका. माझ्या, आमच्या सगळ्यांच्या सद्भावना त्यांच्याबरोबर आहेत, त्या सद्भावना तशाच राहू द्या, असे त्यांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.