Video मुदत संपण्यापूर्वीच ब्रेडला बुरशी; ग्राहकाचा व्हिडिओ व्हायरल
चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध रसराज कंपनीच्या ब्रेडबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रेडची मुदत संपण्यासाठी अजून एक दिवस शिल्लक असतानाच त्याला बुरशी लागल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. ग्राहकाने ब्रेडचे पाकीट उघडताच त्यावरील बुरशीचा व्हिडिओ चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
Comments are closed.