भारताचे 'निःशब्द गाव'

भारतातील गावं स्वत:ची सुंदरता, संस्कृती आणि साधेपणासाठी पूर्ण जगात ओळखली जातात. अनेक ठिकाणी बहरणारी शेती मन मोहून टाकतात, तर पर्वतांदरम्यान वसलेली छोटी छोटी गावं नंदनवनापेक्षा कमी वाटत नाहीत. गावांमधील पहाट पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते आणि संध्याकाळ लोकांच्या गप्पागोष्टीने बहरते. परंतु भारतात एक असे गाव आहे, जेथे मुलांचा किलबिलाट ऐकू येत नाही तसेच लोकांचे साधे संभाषणही कानी पडत नाही. येथे सर्वत्र एक विचित्र शांतता पसरलेली असते. डडकई हे जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील गाव आहे. या गावाला आता लोक ‘सायलेंट व्हिलेज’ या नावाने ओळखतात. या गावाची कहाणी जितकी वेगळी आणि रहस्यमय आहे, तितकीच भावुक अन् वेदनादायी आहे.

डडकई गाव गंडोह तालुक्यात पर्वतांदरम्यान वसलेले आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने भरपूर आहे. चहुबाजूला उंच पर्वत, हिरवाई आणि थंड हवा या गावाला अत्यंत सुंदर स्वरुप प्राप्त करून देते. हे गाव मिनी-काश्मीर नावाने प्रसिद्ध भद्रवाहपासून जवळपास 105 किलोमीटर अंतरावर आहे. परंतु या सुंदरतेमागे एक असे सत्य दडलेले आहे, ज्यामुळे या गावाला पूर्ण जगात वेगळी ओळख मिळाली आहे. येथे राहणारे अनेक लोक ऐकू अन् बोलू शकत नाहीत. खासकरून गावाच्या मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. गावात जवळपास 105 परिवार राहतात, येथील निम्म्याहून अधिक लोक जन्मजात बहिरेपणा अन् मुकेपणाने ग्रस्त आहेत.

या गावात लोकांदरम्यान संभाषणाची पद्धतही उर्वरित जगापेक्षा वेगळी आहे. येथे अनेक लोक खाणाखुणांमध्ये स्वत:चे म्हणणे समजावतात. गावात तुम्हाला सामान्य संभाषण किंवा मुलांचा आवाज कमीच ऐकू येईल. याचमुळे लोक याला सायलेंट व्हिलेज म्हणू लागले आहेत.  येथे मुके अन् बहिऱ्या मुलांच्या जन्मांची प्रकरणे अने वर्षांपासून समोर येत आहेत. या समस्येचे पहिले प्रकरण 1901 मध्ये नोंद करण्यात आले होते. काळासोबत ही समस्या वाढत गेली आहे.

वैज्ञानिकांचे काय सांगणे?

तज्ञांनुसार यामागे अनुवांशिक कारण असू शकते. एकाच समुदाय किंवा जवळच्या नात्यांमध्ये अधिक विवाह झाल्यामुळे ही समस्या पिढ्यानपिढ्या पुढे जात राहिली. याचमुळे गावातील अनेक परिवार आजही या समस्येला तोंड देत आहेत. परंतु गावात राहणारे काही लोक याला अभिशाप देखील मानतात. गावाशी निगडित अनेक कहाण्या आणि मान्यताही येथे प्रचलित आहेत. ज्यावर लोकांचा विश्वास देखील आहे. तर संबंधित आजारामुळे गावातील लोकांना अनेक सामाजिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. ज्या परिवारांमधी लोक मुकबधीर आहेत, तेथे विवाह करण्यास लोक घाबरत आहेत. गावातील  लोकांना स्वत:च्या मुलांबद्दल चिंता वाटत असते. काही परिवार या समस्येने त्रस्त होत गावातून स्थलांतरित झाले आहेत. तरीही गावातील लोक स्वत:च्या जीवनाला सामान्यपणे जगण्याचा प्रयत्न करत असतात.

सैन्य करतेय मदत

या गावाची स्थिती पाहता भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्सने हे गाव दत्तक घेतले आहे. सैन्य येथील लोकांच्या मदतीसाठी सातत्याने काम करत आहे. गावातील मुलांसाठी विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि साइन लँग्वेज शिकविण्यासाठी तज्ञही नियुक्त करण्यात आले आहेत, जेणेकरून मुलांना प्रत्येक गोष्ट समजू शकेल आणि त्यांना कुठल्याही प्रकारची समस्या होणार नाही. याचबरोबर गावात अन्नधान्य, कपडे आणि आरोग्य सुविधांवरही लक्ष देण्यात येत आहे. येथील मुलांना चांगले जीवन आणि शिक्षण मिळू शकेल याकरता सैन्य प्रयत्नशील आहे.

Comments are closed.