राम मंदिराच्या सीईओ पदासाठी अर्ज प्रक्रिया
18 जुलैपर्यंत करता येणार अर्ज
अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या (सीईओ) नियुक्तीसाठी सोमवारी अधिसूचना जारी करण्यात आली. या महत्त्वपूर्ण पदासाठी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्sय माहिती जारी करत अर्ज मागविण्यात आले आहेत. सीईओची नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे. सर्वकाही सुरळीत राहिल्यास कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो. 50-70 वयोगटातील कुठलाही पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतो. सर्वात मोठी पात्रता हिंदू असणे आणि श्रीरामभक्त असणे आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 जुलै निश्चित करण्यात आली आहे.
वृत्तसंस्था: अयोध्या
श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत सीईओ नियुक्त करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. सीईओच्या नियुक्तीचा निर्णय घेताना तीन सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली होती. ही समिती आता अर्जांवर विचार करत सीईओची नियुक्ती करणार आहे.
ठरविण्यात येणार वेतन
ट्रस्टकडून जारी अधिसूचनेनुसार तीन वर्षांसाठी होणाऱ्या नियुक्तीदरम्यान सीईओला अयोध्येतच वास्तव्य करावे लागणार आहे. त्याची किमान पात्रता पदवी असेल आणि हिंदीसोबत इंग्रजीचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. सध्या सीईओचे वेतन निश्चित करण्यात आलेले नाही, थेट चर्चेच्या आधारावर वेतन आणि सुविधा निश्चित करण्यात येणार आहेत.
20 वर्षांचा अनुभव आवश्यक
राम मंदिराच्या सीईओ पदासाठी अर्ज करणाऱ्यांना व्यवस्थापन कार्याचा 20 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. कमीतकमी 20 वर्षांपर्यंत कुठलीही सार्वजनिक संघटना, विभाग, संस्था किंवा एखाद्या कंपनीत व्यवस्थापकीय कार्य केलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. हा अनुभव सामान्य प्रशासन, वित्त, ऑडिट, कार्मिक, जनसंपर्क, माहिती-तंत्रज्ञान, सुरक्षा, कायदा क्षेत्रात असायला हवा. एखाद्या हिंदू मंदिराचे व्यवस्थापन हाताळलेल्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. या सर्व पात्रता बाळगणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यालाही अर्ज करता येणार आहे.
जबाबदारी निश्चित
सीईओला ट्रस्टच्या महामंत्रीबद्दल उत्तरदायी करत अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या वैधानिक, प्रशासकीय आणि वित्तीय कार्यांना सांभाळावे लागणार आहे. राम मंदिराची ख्याती पाहता त्याचे स्वरुप आणि आकारानुसार कार्यप्रणाली विकसित करावी लागेल आणि येथील उद्देशांनुसार स्वरुप आणि पद्धती विकसित कराव्या लागणार आहेत.
सुरक्षा प्रणाली
राम मंदिराशी निगडित अधिकारी, सेवादार, कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करण्यासोबत वर्तमानात सुरू असलेले कार्यक्रम आणि आगामी विकासकार्याचे कुशल संचालन करावे लागणार आहे. ट्रस्टच्या वैधानिक, नियामक आणि दस्तऐवजानुसार कार्यांना पूर्ण करावे लागेल. राम मंदिराची सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे आणि स्थानिक, प्रादेशिक आणि केंद्रीय शासनासोबत समन्वय राखावा लागणार आहे. भाविकांची सुरक्षा, सुविधा आणि समाधानाला प्राथमिकता द्यावी लागेल. वेळोवेळी येणारी व्हीआयपी अतिथी आणि प्रमुख संतांसाठी व्यवस्था करावी लागेल. मंदिर संपत्तींची सुरक्षा अन् नियमानुसार गुंतवणूक करावी लागणार आहे.
Comments are closed.