स्वदेशी 'वन-वे' ड्रोनची खरेदी प्रक्रिया सुरू.

भारतीय कंपन्या करणार सैन्याला पुरवठा

नवी दिल्ली : सैन्याने देशात निर्मित दीर्घ पल्लायुकत, वन-वे अटॅक ड्रोन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 1 हजार किमीपर्यंत अचूक लक्ष्यभेद करू शकणाऱ्या, जीपीएसरहित वातावरणात काम करू शकतील आणि एआय-आधारित टार्गेटिंग सुविधा असलेल्या सिस्टीमचे प्रस्ताव कंपन्यांकडून मागविण्यात आले आहेत. ‘लाँग रेंज लोइटर म्यूनिशन’ प्रोजेक्टच्या अंतर्गत ड्रोन खरेदी करण्याची ही प्रक्रिया एक्विजिशन पॉलिसीच्या ‘मेक 2’ क्लॉज अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार कंपन्यांना स्वत:चे संशोधन अन् विकासाचा खर्च उचलावा लागतो आणि जर सर्व तांत्रिक क्षमता पूर्ण झाली तर सैन्य ते खरेदी करण्याची तयारी दर्शविते. परंतु सध्या या ड्रोन्सची संख्या निश्चित करण्यात आली नसली तरीही भारताला वेगवेगळा मारक पल्ला असलेल्या हजारो वन-वे अटॅक ड्रोन्सची आवश्यकता आहे.

प्रभावी प्रणालीचा शोध

वर्तमान प्रक्रियेत सैन्य 50 मीटरच्या ‘किलिंग रेडियस’ (घातक कक्षा)साठी 25 किलोग्रॅमचे वॉरहेड वाहून नेऊ शकणाऱ्या, 5 हजार मीटरपेक्षा अधिक उंची गाठणाऱ्या आणि कमीतकमी 400 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठू शकणाऱ्या प्रणालीच्या शोधात आहे. आवश्यक ड्रोनप्रणालीला मैदानी भाग, वाळवंट, जंगल आणि पर्वतीय भागांमध्ये काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले असावे आणि मिलिट्री स्टँडर्डनुसार मजबूत केले जाण्याचा निकष आहे.

दोन कंपन्या शॉर्टलिस्ट

या खरेदीची प्रक्रिया ‘रेजिमेंट ऑफ आर्टिलरी’ने सुरू केली आहे, यात कमी पल्ल्याच्या वन-वे अटॅक ड्रोन्सची खरेदी देखील केली जात आहे. अलिकडेच 850 ड्रोन्स खरेदीसाठी ‘टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड’ आणि ‘निबे डिफेन्स’ला शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे, हे ड्रोन 100 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्याचा भेद घेण्यास सक्षम असतील.

संपूर्ण इकोसिस्टम

एलआरएलएम कार्यक्रमाच्या अंतर्गत सैन्य दीर्घ पल्लायुक्त वन-वे अटॅक ड्रोन्सच्या ऑपरेशनसाठी एक पूर्ण इकोसिस्टीम निर्माण करू इच्छित आहे. लाँच व्हेईकल, ग्राउंड कंट्रोल स्टेशन, सिम्युलेटर आणि 15 एरियल व्हेईकल सामील अशा पूर्ण सेटची सैन्याला आवश्यकता असेल. उभा चढाव, उतार, जमिनीच्या अत्यंत नजीक (नेप-ऑफ-द-अर्थ) उ•ाण करत लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम असणारा ड्रोन सैन्याला हवा आहे. अशाप्रकारचे ड्रोन सध्या रशिया-युक्रेन युद्धात वापरले जात आहेत. या ड्रोन्सना वेगवेगळ्या प्रकारचे वॉरहेड वाहून नेण्यास सष्घ्म असावे लागेल, ज्यात थर्मोबेरिक अन् डीप पेनिट्रेशन वॉरहेड सामील आहे.

सुट्या भागांविषयी खबरदारी

इंजिन, इलेक्ट्रो-ऑप्टिक पेलोड, एवियोनिक्स, मेनफ्रेम, वॉरहेड आणि इतर सुटे भाग स्वदेशी आहेत का विदेशातून मागविण्यात आले आहेत हे सैन्य जाणून घेत आहे. भारतात अशाप्रकारचे ड्रोन तयार करण्यासाठी एक स्वतंत्र इकोसिस्टीम तयार व्हावी जेणेकरून आवश्यकता भासल्यास सशस्त्र दलांकरता या ड्रोन्सचे उत्पादन वेगाने वाढविता येऊ शकेल.

Comments are closed.