इंग्लंडने जिंकली नाणेफेक, शुभमन गिलचा पहिल्याच सामन्यात धडाकेबाज निर्णय, भारताची खतरनाक Playing

बर्मिंगहॅम वरून भारत विरुद्ध इंग्लीश पहिला एकदिवसीय नाणेफेक अपडेट: भारतीय क्रिकेट संघासाठी युनायटेड किंगडम (UK) मधील गेल्या तीन आठवड्यांचा काळ एखाद्या वाईट स्वप्नासारखा राहिला आहे. आधी आयर्लंडविरुद्ध 2-0 आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत 4-0 ने मिळालेल्या पराभवामुळे टीम इंडियाच्या कामगिरीवर अनेक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गेल्या 7 सामन्यांपैकी 6 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहेत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी भारतीय संघ आज मंगळवार (14 जुलै) पासून इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात करत आहे. या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जाईल. पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः गेल्या काही काळातील श्रीलंका (SL), ऑस्ट्रेलिया (AUS) आणि न्यूझीलंड (NZ) विरुद्धच्या वनडे मालिकांमधील निराशाजनक कामगिरी पाहता, भारताला या मालिकेतून पुन्हा फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेकीनंतर शुभमन गिल काय म्हणाला?

शुभमन गिल म्हणाला की, “आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. आमच्या बहुतांश खेळाडूंनी टी-20 मालिका खेळली आहे, तर इतरांनीही चांगला सराव केला असून ते आजच्या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. ही मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. येथूनच आमच्या तयारीला सुरुवात होत आहे. कोणती संघरचना वापरता येईल, कोणते कॉम्बिनेशन यशस्वी ठरू शकतात आणि कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना संधी कशी देता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत.आमचे वरिष्ठ खेळाडू विराट भाऊ, रोहित भाऊ आणि केएल राहुल संघात परतले आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. या मैदानावरच्या आमच्या काही चांगल्या आठवणी आहेत.आजच्या सामन्यासाठी आम्ही चार प्रमुख वेगवान गोलंदाजांसह शिवम दुबेचा अतिरिक्त वेगवान गोलंदाजीचा पर्याय ठेवला आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे दोन फिरकीपटू संघात आहेत.”

टीम इंडियाची प्लेइंग-11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह, प्रसीध कृष्णा.

इंग्लंडने Playing XI आधीच जाहीर केली

इंग्लंडने सामन्याच्या एक दिवस आधीच आपल्या प्लेइंग-11 खेळाडूंची घोषणा केली आहे. जेकब बेथेल आणि बेन डकेट ही नवी सलामीची जोडी भारताविरुद्ध डावाची सुरुवात करणार आहे. उर्वरित बहुतांश खेळाडू टी-20 मालिकेत खेळलेलेच असून, याच संघाने भारताला एकही सामना जिंकू दिला नव्हता.

इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन : जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (कर्णधार), सॅम कुरन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टोंग आणि आदिल रशीद.

आमनेसामने लढतींमध्ये कोणाचे पारडे जड? (IND vs ENG ODI Head-to-Head)

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत 110 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 61 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 44 सामने जिंकले आहेत. दोन सामने ड्रॉ राहिले तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. हेड-टू-हेड आकडेवारी पाहता भारतीय संघाचा दबदबा स्पष्टपणे दिसून येतो. मात्र, सद्यस्थिती पाहता टीम इंडियाला मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघाची कामगिरी कशी?

एकूण आकडेवारी भारताच्या बाजूने असली, तरी इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला हरवणे भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. भारताने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण 44 एकदिवसीय सामने खेळले असून, त्यापैकी 18 जिंकले आहेत आणि 23 गमावले आहेत. एक सामना ड्रॉ राहिला तर दोन सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला. इंग्लंडच्या घरच्या मैदानावर यजमान संघाचे पारडे नक्कीच जड राहिले आहे. परंतु, भारताने यापूर्वी येथे इतिहास घडवला आहे. भारताने इंग्लंडमध्ये शेवटची वनडे मालिका 2022 मध्ये खेळली होती, जिथे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने चमकदार कामगिरी करत ती मालिका 2-1 अशी खिशात घातली होती.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव.

IND vs ENG ODI मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

14 जुलै 2026 : पहिला ODI, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम (3:30 दुपारी)
16 जुलै 2026 : दुसरी वनडे, सोफिया गार्डन्स, कार्डिफ (5:30 संध्याकाळी)
19 जुलै 2026 : तिसरा एकदिवसीय, लॉर्ड्स, लंडन (3:30 संध्याकाळी)

हे ही वाचा –

127 किलोचा क्रिकेटर, एका कॅचने बनला वर्ल्ड कपचा हिरो; आता कुठे आहे बर्म्युडाचा ड्वेन लेवरॉक?

Comments are closed.