Ratnagiri News – एक दिवस आपल्या गावासाठी; मंडणगड गोठे गावात युवांनी जलसंवर्धनाची राबवली संकल्पना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अगदी दरवर्षीच पाणी टंचाईच्या भेडसावणाऱ्या समस्येच्या संकटावर मात करण्यासाठी केवळ नुसतीच चर्चा करत बसण्यापेक्षा मुंबईतून आपल्या गोठे गावी येत श्रमदानातून वृक्षारोपण व ‘पाणी अडवा पाणी जिरवा ‘ ही मोहीम प्रत्यक्षात गोठे येथे येऊन येथील युवकांनी राबवली यासाठी स्थानिक ग्रामस्थ व महिला मंडळाचीही त्यांना उत्स्फूर्त साथ मिळाली. प्रत्यक्ष कृतीवरच भर देण्याचे केलेले महत्त्वाचे काम म्हणजेच पाणी टंचाईची समस्या भेडसावणाऱ्या गावांसाठीचा हा आदर्श म्हणावा लागेल.

युवा प्रतिष्ठान गोठे गाव मंडणगड यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण आणि जलसंवर्धन २०२६ हा उपक्रम ग्रामस्थांच्या सहभागातून मोठ्या उत्साहात पार पडला. ‘एक दिवस गावासाठी’ या संकल्पनेच्या प्रत्यक्ष कृतीची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई शहरासह विविध ठिकाणी धंदा व्यवसाय चाकरी करणा-या ६० हुन अधिक युवा चाकरमान्यांनी आपल्या गोठे गावात दाखल होत श्रमदानातून जलसंवर्धनाचा संदेश दिला.

भविष्यात गावाला पाण्याची टंचाई भासू नये, या उद्दात हेतूने मागील ६ वर्षांपासून मंडणगड तालुक्यातील गोठे गावात वृक्षारोपण तसेच ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहीम दरवर्षी अखंडीतपणे राबविली जात आहे. यावर्षीही ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावयाचे होते त्याकरिता खड्डे खोदण्यासाठी जेसीबी यंत्राच्या मशीनची मदत घेण्यात आली. त्यानंतर युवकांनी श्रमदान करून लागवड व जलसंवर्धनाची कामे पूर्ण केली. कोकणातील विविध गावांतील खेडयामंधील लोक रोजगारासाठी मुंबई पुणे ठाणे आदी विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. त्याला गोठे गावही अपवाद नाही . येथीलही मोठ्या प्रमाणात युवक आपल्या रोजीरोटीसाठी मुंबई व उपनगरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. मात्र गावाशी असलेली नाळ त्यांची कायमच टिकून आहे.त्यामुळे त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा ही जलसंवर्धनाची संकल्पना राबवत वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला.या उपक्रमात उत्स्फूर्त सहभागी झालेल्या एवढ्या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या युवकांच्या भोजनाची व्यवस्था स्थानिक ग्रामस्थ व महिला मंडळाने खुशीने केली. या साठी लागणाऱ्या खर्चालाही ग्रामस्थ आणि युवकांनी सढळ हस्ते मदत केली.

गावाला आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठांच्या कार्याचा वारसा आता नव्या पिढीने समर्थपणे स्वीकारला आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवक गावाच्या विकासासाठी पुढाकार घेत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. सलग ६ वर्षे राबविलेल्या या मोहिमेचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. गावाच्या मुख्य पाणवठ्याला पाणी पुरविणारे पूर्वी आटत चाललेले झरे पुन्हा जिवंत होऊ लागल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे सुट्टीसाठी गावी येणाऱ्या ग्रामस्थांची पाण्याविषयीची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.

Comments are closed.