कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्

इंदापूर : राज्यातील कर्जमाफीबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलताना  राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले की, कर्जमाफीचा निर्णय हा मूठभर शेतकऱ्यांना फायद्याचा तर बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा आहे. मुख्यमंत्री हे अर्थशास्त्राचे जाणकार आहेत. त्यांनी वीस वर्षांपूर्वी पुस्तक लिहिलं होतं, अर्थसंकल्प कसा सादर करावा त्याला मी देखील हजर होतो. मुख्यमंत्र्यांनीच 2024 ला निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की, आम्ही सरसकट कर्जमाफी करू असंही पुढे शेट्टींनी म्हटलं आहे. (Raju Shetti)

विहीर खोदण्यासाठी ट्रॅक्टर घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेलं कर्ज मुक्त करणे याला कर्जमुक्ती असे म्हणतात. ही कर्जमुक्ती नाही तर कर्ज वसुली आहे. ज्यांचे शेत आहे, ज्यांचे अर्धा एकर द्राक्ष आहेत, ज्यांचे डाळिंब आहे, तो छोटा शेतकरी आहे, त्याला फायदा होणार नाही. परदेशी राहणारा एक माणूस या समितीत आहे, त्यांना शेतकऱ्यांचे वाटोळ करायचं आहे ते केलं आहे. यातून फक्त काहीच मूठभर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सरकार शेतकऱ्यांना फसवत आहे. जे इन्कम टॅक्स भरतात ते देखील गरीब शेतकरी आहेत फक्त त्यांच्या खात्यावर पैसे येतात त्यामुळे ते इन्कम टॅक्स भरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर जो कारखान्याला ऊस वाहतूक करतो त्याला कारखान्याचे पैसे येतात, ते वाटप करायचे असतात, मात्र त्याच्या खात्यावर येतात, त्याच्यामुळे तो वंचित राहतो आहे. त्यामुळे ही लोक देखील कर्जमाफीमध्ये आली पाहिजे, असंही पुढे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी म्हटलं आहे. (Raju Shetti)

तर आज होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारावरती बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, अंमलबजावणी करण्याआधीच सत्कार करणे म्हणजे हा लाळगोटेपणा आहे. स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेणे असे याला म्हणतात. 30 जुलैच्या आधी देखील शेतकरी कर्जमाफी होणार नाही, आणखी नवीन तारीख मिळेल. 30 जुलैच्या आधी जर कर्जमाफी झाली नाही तर 30 जुलै नंतर आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहे, जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जे रेगुलर कर्ज भरतात त्यांचं काय प्रामाणिकपणे राहून देखील त्यांना फक्त 50 हजार रुपये मिळणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. (Raju Shetti)

loan waiver : प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली

मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना माहिती दिली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळेल आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करतो, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. कर्जमाफीच्या निर्णयासाठी 2029 पर्यंत थांबू शकलो असतो मात्र आम्ही तसं केल नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेदेखील वाचा

Comments are closed.