मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, उद्धव ठाकरेंना विश्नास

उद्धव ठाकरे: मुंबईतील मातोश्री निवासस्थानी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 14 नगरसेवकांची बैठक घेतली.  नगरसेविका मंगला आढाव या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्या बैठकीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र रोहन आढाव यांनी बैठकीला उपस्थित होते. मला नाशिककरांचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडणार नाहीत, याचा मला कायम विश्वास आहे, असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी  बैठकीत बोलताना व्यक्त केले.

काही खासदार पक्ष सोडून गेले, मात्र नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले

काही खासदार पक्ष सोडून गेले, मात्र नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. नाशिकचे नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच मी नाशिकला कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी नगरसेवकांना दिली. वाईट काळ निघून जाईल आणि चांगला काळ नक्कीच येईल, असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त केला.

Comments are closed.