पावसाळी किटकांनी हैराण? वापरा या सोप्या ट्रिक्स




पावसाळ्यातील कीटकांवर घरगुती उपाय


पावसाळ्यात संध्याकाळी लाईट आणि बल्बच्या अवतीभोवती कीटक जमा होतात. विशेष करून बाल्कनी किंवा घराबाहेरील लाईट लावताच लहान सहान कीटक, कडे घिरट्या घालत असल्याचं दिसतं. अशावेळी बाहेर बसणेही कठीण होते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर पुढील सोपे उपाय करू शकता. monsoon insects home remedies

1 चमचा मोहरीचं तेल आणि एक प्लास्टिक पिशवी घ्या. आता या प्लास्टिक पिशवीला मोहरीचं तेल चांगल्या प्रकारे लावा. त्यानंतर लाईटच्या इथे ती पिशवी लावा. पण तिचा स्पर्श लाईटला होणार नाही याची काळजी घ्या. संध्याकाळच्या वेळी या ट्रिकमुळे कीटकांचा त्रास नक्की कमी होऊ शकतो.

मोहरीचे तेल

माशा आणि इतर उडणाऱ्या कीटक लिंबू आणि लवंगाच्या वासाने दूर पळतात. त्यामुळे एक लिंबू मधोमध कापून घ्या. त्या दोन्ही भागांवर 7 ते 8 लवंगा खोचा आणि हे लिंबू घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीत ठेवून द्या.

कडुनिंबाचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण कीटकांना पळवण्यासाठी सर्वोत्तम आहे. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात 2 चमचे कडुनिंबाचे तेल आणि दोन कापूर वड्यांची पावडर मिक्स करा. हे मिश्रण घराच्या कोपऱ्यात आणि खिडक्यांवर स्प्रे करा. याच्या तीव्र वासामुळे कीटक पळून जातात.

लवंग

लसणामध्ये असणारा सल्फरचा वास कीटकांना लांब ठेवण्यास मदत करतो. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या पाण्यात उकळून घ्या. ते पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि खिडक्या-दरवाजांच्या कडांवर मारा.

संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत पावसाळी कीटक जास्त ॲक्टिव्ह असतात, त्यामुळे या वेळेत खिडक्यांचे दरवाजे बंद ठेवा किंवा जाळी वापरा. तसेच, घरात कुठेही ओलावा किंवा कचरा साचू देऊ नका, कारण दमट वातावरणात हे कीटक वेगाने वाढतात.

विंडो नेट

हेही वाचा – रंग बदललेले मसाले वापरावेत का ?



Comments are closed.