पांडुरंग, वारकरी-भक्तांपेक्षा कुणीही मोठा नाही, VIP दर्शनाबाबत कॉम्प्रमाईज नाही : जयकुमार गोरे
Jaykumar Gore on Pandharpur Vitthal Mandir VIP Darshan : आषाढीच्या (आषाढी वारी 2026) काळात सर्वसामान्य वारकऱ्यापेक्षा किंवा विठ्ठलापेक्षा कोणीही मोठा अथवा व्हीआयपी नाही. व्हीआयपी दर्शनामुळे वारकऱ्याच्या दर्शनाचा वेळ वाढत असेल, त्याला त्रास होत असेल, तर व्हीआयपी दर्शन बंद करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आपण, आपले सहकारी आमदार, मंत्री यांना विनंती करतो की आषाढीच्या काळात व्हीआयपी दर्शनाचा आग्रह न करता मुखदर्शन घेऊन वारकऱ्यांचा वेळ वाचवावा. आपल्या व्हीआयपी दर्शनामुळे वारकऱ्यांना तासनतास दर्शन रांगेत थांबावे लागत असेल तर त्यांचा त्रास आणि वेळ वाचवणे हीच खरी विठ्ठल सेवा आहे, असे आवाहनही पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सहकारी आमदार खासदार आणि मंत्र्यांना केल आहे.
Jaykumar Gore : व्हीआयपी दर्शनाच्या बाबतीत कोणतेही कॉम्प्रमाईज नाहीउल्लंघन केल्यास त्यावर कठोर कारवाई
दरम्यानआषाढी यात्रा काळात दर्शन घेणे ही भावना आपण समजू शकतो. मात्र अशा व्हीआयपीसाठी अगदी पंधरा ते वीस मिनिटात मुखदर्शनाची व्यवस्था केली जाईल. मात्र वारकऱ्यांना त्रास होऊन व्हीआयपी दर्शनाच्या भानगडीत कोणी पडू नये, अशी क्षमा मागून विनंती करतो असे आवाहनही यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. आता व्हीआयपी दर्शनाच्या बाबतीत कोणतेही कॉम्प्रमाईज केले जाणार नसून तशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या असून मंदिर समितीला ही याबाबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरातील काही कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वागत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांची नावे आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. असे कर्मचारी परत मंदिरात दिसता कामा नयेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे गोरे यांनी सांगितले आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देताना व्हीआयपी दर्शनाच्या बाबतीत कोणी उल्लंघन केल्यास त्यावर कठोर कारवाई करावी लागेल, असा इशाराही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
Pandharpur Vitthal Mandir VIP Darshan : व्हीआयपी दर्शन बंदी आदेशाचे वारकरी सांप्रदायातून जोरदार स्वागत
व्हीआयपी दर्शन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या असून वारकऱ्यांना कोणताही त्रास न होता वेळेत दर्शन झाले पाहिजे, असे त्यांचे सांगणे आहे. यासाठीच व्हीआयपी दर्शन बंद केले असून त्याची अंमलबजावणी होणारच, असे गोरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या व्हीआयपी दर्शन बंदी आदेशाचे वारकरी सांप्रदायातून जोरदार स्वागत होत असून सध्या दर्शन रांगेतील भाविकांच्या दर्शनाची वेळ यामुळे निम्म्यानी कमी झाली असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Comments are closed.