पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतल

छत्रपती संभाजीनगर क्राईम न्यूज: छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय धक्कादेणारा बातमी समोर आली आहे. ​वाळूज परिसरातून बेपत्ता झालेल्या 26 वर्षीय सायमा चौधरी आणि तिच्या 14 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाचा खून (Chhatrapati Sambhajinagar Crime) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या वादातून सायमाचा गळा आवळून हत्या करण्यात आली, तर निष्पाप बालकाला वाहत्या पाण्यात फेकून देण्यात आले आहे. नाशिकमधील विहिरीत सायमाचा मृतदेह (Crime News) आढळला होता, ज्याची ओळख तिचे कपडे आणि दागिन्यांवरून पटली. या कमीमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून सध्या पोलीस याचा अधिक तपास करत आहे.(छत्रपती संभाजीनगर गुन्हे)

दरम्यान​आर्थिक व्यवहारातील पुराव्यांवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, संशयित नुरजमा अहमद चौधरी आणि सद्दाम ऊर्फ आमीर चौधरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलावून सायमाचा कारमध्येच काटा काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या क्रूर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, एमआयडीसी वाळूज पोलीस अधिक तपास करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: कायद्याचा रक्षकच गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात; विवाहित महिलेने केले गंभीर आरोप

दुसरीकडेछत्रपती संभाजीनगरात कायद्याचा रक्षकच गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोलीस उपनिरीक्षक हरीष खटावकर याच्याविरोधात एका विवाहित महिलेने लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे गंभीर आरोप केले आहेत. चार वर्षांपूर्वी झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत लग्नाचं आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

दरम्यानतक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, चार वर्षांपूर्वी तिची पोलीस उपनिरीक्षक हरीष खटावकर यांच्याशी मैत्री झाली. 15 जुलै रोजी आरोपीने महिलेला कारमध्ये बसवून मारहाण केली, मोबाईल हिसकावून घेतला आणि निर्जन ठिकाणी सोडून दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक हरीष खटावकर यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.