मुंबई शहराच्या किक बॉक्सर्सची सुवर्णझेप; एकूण 14 पदकांची दिमाखदार कमाई
ऑल महाराष्ट्र स्टेट सीनिअर अॅण्ड मास्टर्स किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन, मुंबई शहरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट व नेत्रदीपक कामगिरीसह एकूण 14 पदकांची कमाई केली. यामध्ये 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्यपदके आहेत. या नेत्रदीपक कामगिरीने मुंबई शहराच्या क्रीडा परंपरेत आणखी एका सुवर्ण अध्यायाची भर घातली.
या संपूर्ण संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय रेफ्री व प्रशिक्षक विघ्नेश मुरकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तसेच स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरचे जिल्हाध्यक्ष उमेश मुरकर यांनी खेळाडूंना सातत्याने मार्गदर्शन, प्रेरणा व प्रोत्साहन देत संघाच्या या उल्लेखनीय यशामध्ये मोलाचे योगदान दिले. स्पर्धेदरम्यान आफताब खान, आलोक ब्रीद आणि सय्यद अहमद यांनी प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली.
या देदीप्यमान यशाबद्दल किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी सर्व पदक विजेते खेळाडू, प्रशिक्षक, जिल्हाध्यक्ष उमेश मुरकर, संघप्रमुख विघ्नेश मुरकर तसेच संपूर्ण मुंबई शहर संघाचे अभिनंदन केले. तसेच 1 ते 5 ऑगस्ट 2026 या कालावधीत अहमदाबाद येथे होणाऱ्या वाको इंडिया राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेसाठी मुंबई शहराच्या संघाला शुभेच्छा देत राष्ट्रीय स्तरावरही अशीच सुवर्णमयी कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला. मुंबई शहराच्या खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे राज्यातील किक बॉक्सिंग क्षेत्रात मुंबई शहराचे स्थान अधिक भक्कम झाले असून आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही हीच विजयी परंपरा कायम राहील, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
सर्व पदक विजेते पुढीलप्रमाणे
सुवर्णपदक – हर्ष साळेकर (लो किक), विन्स पाटील (पॉइंट फायटिंग व लाईट कॉन्टॅक्ट – दुहेरी सुवर्ण), अश्विनी जांबले (पॉइंट फायटिंग), दर्शना आगवणे (किक लाईट), तृष्णा नाईक (लाईट कॉन्टॅक्ट व किक लाईट – दुहेरी सुवर्ण).
रौप्यपदक – अश्विनी जांबले (लाईट का@न्टॅक्ट), साहिल बापेरकर (के-1), प्रज्ञेश पटवर्धन (पॉइंट फायटिंग).
कांस्यपदक – दर्शना आगवणे (पॉइंट फायटिंग), आशीष महाडिक (पॉइंट फायटिंग), मनीष प्रजापती (किक लाईट), अवनीश कदम (किक लाईट).
Comments are closed.