Jalna News – व्यापार्‍याची 4.96 लाखांची रोकड लुटणारे चौघे जेरबंद; 5.72 लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात व्यापार्‍याला खंजराचा धाक दाखवून रोख रक्कमेची बॅग हिसकावून नेणार्‍या चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत अटक केली. आरोपींकडून ५ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

15 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास नवीन मोंढा परिसरात व्यापारी उमेश मधुसूदन बजाज (रा. जालना) यांना तीन जणांनी अडवून खंजराचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील ४ लाख ९६ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले.

या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान अयान उर्फ पंच्यान्नव अमजद अली (रा.हिंदनगर,जालना) , शेख उमर शेख रहिम (गुंडेवाडी), शेख अब्दुल शाहिद उर्फ मीटर शेख रशिद (हिंदनगर,जालना) आणि आरिफ रहिमोद्दीन अन्सारी (रा.हिंदनगर, जालना) यांना ताब्यात घेतले.

व्यापार्‍याकडे मोठी रोकड असल्याची माहिती आरिफ अन्सारीने इतर आरोपींना पुरवल्याचे तपासात समोर आले. पोलीसांनी आरोपींकडून ४ लाख ८१ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम,गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल, चार मोबाईल फोन, एक खंजर आणि फिर्यादीची बॅग असा एकूण ५ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार गोपाल गोशिक, रमेश राठोड,प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप,दत्ता वाघुंडे, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, शिवप्रसाद एखंडे,रमेश काळे, वैâलास चेके, योगेश शहाणे, धीरज भोसले, सुनिल पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Comments are closed.