शिवसेनेचे संघटन मजबूत करणार, भरणे विभागाच्या बैठकीत निर्णय
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी खेड तालुक्यात विभागनिहाय बैठका सुरू आहेत. आज भरणे विभागाची बैठक उत्साहात पार पडली.
ही बैठक तालुकाप्रमुख सचिन निकम यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. बैठकीत संघटनात्मक मजबुती, आगामी पक्षीय उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी सांगितले की, तालुक्यातील सर्व विभागांच्या बैठका पूर्ण झाल्यानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या तालुका बैठकीत जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला महिला आघाडीच्या तालुका संघटक अंकिता बेलोसे यांच्यासह भरणे विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Comments are closed.