Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra Breaking News LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर… 

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य

Mohan Yadav Statement On UCC : मध्य प्रदेशमध्ये समान नागरी कायद्याबाबत (UCC) मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी एक अत्यंत मोठं आणि खळबळजनक विधान केले आहे. "देशात सर्वांसाठी एकच कायदा असायला हवा. जर राम एकच लग्न करणार, तर रहीम दोन, तीन किंवा चार लग्ने का करणार? जो एक लग्न करेल, त्यालाच राज्यात राहण्याचा अधिकार मिळेल," अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपली भूमिका मांडली. कटनी येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, जेव्हा ‘एक देश, एक विधान आणि एक निशाण’ हे तत्व आपण मानतो, मग हिंदूंचा कायदा वेगळा आणि मुस्लिमांचा कायदा वेगळा का असावा? सर्वांसाठी एकच कायदा लागू झाला पाहिजे. या कायद्याला मंजुरी देण्यासाठी आगामी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Maharashtra Rain News : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली (Maharashtra Rain News)  आहे. त्यामुळं काही प्रमाणात शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे. राज्यातील बीड, सोलापूर अंबरनाथ या भागात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात लोकांना पावसाची प्रतिक्षा होती, अखेर पावसानं हजेरी लावली आहे. 

Comments are closed.