सोनम वांगचूक यांना ‘जंतर मंतर’वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया
सोनम वांगचुक दिल्लीवर अभिजीत डिपके : सामाजिक कार्यकर्त्या सोनम वांगचुक (गोल्डन वांगचुक) यांचे गेल्या वीस दिवसापासून उपोषण प्रारंभ असून सोनम वांगचूके यांच्या आंदोलनाचा आजचा २१ दिवस आहे. एकंदरीत देशभरातून या आंदोलना पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे सरकारकडून फक्त अद्यापपर्यंत कुठलीही दखल नाही घेतल्याचे समोर आलं आहे. असे असताना NEET परीक्षेतील कथित फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर इथे उपोषणाला बसलेल्या पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आलं आहे. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात जंतरमंतरवरून सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरुन हटवलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आंदोलन स्थळावरुन हटवल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईनंतर जंतर-मंतरवर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे या सर्व घडामोडींवर कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke on Sonam Wangchuk) यांनी पहिली प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. . . . (सोनम वांगचुक – उपोषण)
Abhijeet Dipke on Sonam Wangchuk : आंदोलकांना मारहाण केली, जबरदस्तीने घटनास्थळावरून हटवले
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात एक गंभीर दावा केला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर कारवाई करताना आंदोलकांना मारहाण केली आणि सोनम वांगचुक यांना घटनास्थळावरून जबरदस्तीने हटवले.
दिल्ली पोलीस जंतरमंतरवर कारवाई करत आहेत. लोकांना मारहाण करून सोनम सरांना जबरदस्तीने पळवून नेले
— अभिजीत दिपके (@abhijeet_dipke) 18 जुलै 2026
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची मागणी नेमकी काय?
सोनम वांगचुक आणि या आंदोलनाशी संबंधित संघटनांची एक प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही होती. स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झालाय, असा आरोप त्यांनी केला. तसेच, आंदोलकांनी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (NTA) कामकाजाची निष्पक्ष चौकशी, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकरणांची पारदर्शक तपासणी आणि परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याची मागणीही केली.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Comments are closed.