गारफिल्ड सोबर्स यांचे निधन – क्रिकेट विश्व शोककळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशा तिन्ही क्षेत्रांत अतुलनीय आणि अमानवीय कामगिरी करणाऱया सर गारफिल्ड सोबर्स यांच्या निधनाने अवघं क्रिकेटविश्व स्तब्ध झालं आहे. त्यांच्या निधनाबद्दल क्रिकेटचं एक युग अस्ताला गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट संघटनाच नव्हे, तर क्रिकेटपटू आणि क्रिकेटविश्वाशी संबंधित सारेच शोकसागरात बुडाले आहेत.

वेस्ट इंडीज क्रिकेटमधील एका महान खेळीचा शेवट झाला. सर गारफिल्ड सोबर्स यांच्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.

क्रिकेट वेस्ट इंडिज

क्रिकेटमधील सर्वकालीन महान अष्टपैलूंपैकी एक आणि खेळाचा खरा दिग्गज हरपला. त्यांच्या योगदानाने अनेक पिढय़ांना प्रेरणा मिळत राहील.

बीसीसीआय

क्रिकेटने आपल्या सर्वात महान अष्टपैलूला गमावले. ‘सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी’च्या माध्यमातून त्यांचा वारसा कायम जिवंत राहील.

आयसीसी

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या सर सोबर्स यांना आमची आदरांजली! त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना!!

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड

सोबर्स यांच्या निधनाने आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी आमच्या क्लबसाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.

नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लब

Comments are closed.