क्रिकेटचा अष्टपैलू सूर्य मावळला; महान क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांचे 89व्या वर्षी निधन
क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान अष्टपैलू हा मुकुट मिरवणारे सर गारफिल्ड (गॅरी) सोबर्स यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने जागतिक क्रिकेटने आपल्या सर्वाधिक प्रतिभावान आणि प्रभावी खेळाडूंपैकी एका अष्टपैलू खेळाडूच गमावला नसून, आपल्या सर्वात तेजस्वी युगातील एक अख्खा अध्याय गमावला आहे.
1954 ते 1974 या दोन दशकांच्या कारकिर्दीत वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करताना सोबर्स यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत अप्रतिम ठसा उमटवला. त्यांनी 93 कसोटी सामन्यांत 8,032 धावा 57.78 च्या सरासरीने केल्या, तर 235 विकेटही टिपले. 1958 मध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 365 धावा करत त्यांनी त्यावेळचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम तब्बल 36 वर्षे अबाधित
होईल.
1968 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सलग सहा षटकार ठोकणारे ते जगातील पहिले फलंदाज ठरले. डावखुरा फलंदाज, वेगवान तसेच फिरकी गोलंदाज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक अशी त्यांची बहुआयामी ओळख होती. क्रिकेट समालोचक रिची बेनॉ यांनी त्यांना ’जगाने पाहिलेला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू’ असे गौरविले होते.
1975मध्ये क्रिकेटमधील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारकडून त्यांना ‘सर’ हा किताब बहाल करण्यात आला होता. 2009 मध्ये त्यांचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश झाला. त्यांच्या निधनाने क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाचा शेवट झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
Comments are closed.