ENG vs IND: निवृत्ती नव्हे, तर 'यामुळेच' लॉर्ड्सवरील वनडे सामना रोहितसाठी खास, विराटसोबत घडवेल इतिहास
इंग्लंड आणि भारत यांच्यातील वनडे मालिका शेवटाला आली आहे. तीन सामन्यांची ही वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे रविवारी (19 जुलै) दोन्ही संघांमध्ये होणारा तिसरा सामना मालिका निर्णायक आहे. लॉर्ड्सवरील ऐतिहासिक मैदानावर होणारा हा सामना भारताचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी खास असेल.
या सामन्याआधीच रोहितच्या निवृत्तीच्या चर्चेला जोर धरला आहे. हे तर्कवितर्क भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फेटाळून लावले आहेत. या चर्चेला पूर्णविराम देत हा सामना रोहित आणि विराट या दोघांसाठी ऐतिहासिक कसा ते जाणून घेऊ. अशी कामगिरी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणीही केली नाही.
‘हिटमॅन-किंग’चा ऐतिहासिक क्षण
लॉर्ड्सवर पाऊल ठेवताच रोहित आणि विराट ही जोडी एकत्र 400 वा आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठेल. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भारतीय खेळाडूंनी एकत्र इतके सामने खेळण्याचा योग आला आहे. दोघांसाठी हा ऐतिहासिक टप्पा गाठणे म्हणजे एक दिग्गज कथा लिहिण्यासारखे आहे.
जागतिक विक्रम ‘या’ दिग्गजांच्या नावावर
एकत्र सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत रोहित-विराट जोडीने भारताच्या अनेक महान खेळाडूंना खूप आधीच मागे टाकले आहेत. भारतासाठी एकत्र सर्वाधिक सामने खेळण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड ही दिग्गज जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी ३९१ आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत.
जागतिक क्रिकेटची यादी पाहिली तर श्रीलंकेचे दिग्गज कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर एकत्र सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम आहे. त्यांनी 550 आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत.
प्रमुख जागतिक जोड्या (आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण सामने)
1) कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने (श्रीलंका) – 550 सामने
2) महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – 426 सामने
3) कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – 418 सामने
4) सनथ जयसूर्या आणि मुथय्या मुरलीधरण (श्रीलंका) – 408 सामने
5) जॅक कॅलिस आणि मार्क बाऊचर (दक्षिण आफ्रिका) – 407 सामने
6) रोहित शर्मा आणि विराट कोहली (भारत) – 399* सामने
Comments are closed.