दोन महिन्यांपूर्वी मैत्री, एक महिन्यापासून लिव्ह-इनमध्ये; मोबईलवरील चॅटिंग संशय अन् थरार; 16 वर
बेंगळुरू: सोशल मीडियावरील चॅटिंगच्या वादातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची (गर्लफ्रेंड) गोळ्या झाडून हत्या (Crime News) केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना बेंगळुरूच्या दक्षिण जिल्ह्यातून समोर आली आहे. हे भयंकर हत्याकांड घडवल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मुलाने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने मृतदेह (Crime News)पुरून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या भावाला आणि काकाला अटक केली आहे.(Crime News)
Crime News: दुसऱ्या मुलासोबत चॅटिंग केल्याने झाला वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० जुलै रोजी कोडीहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केम्पलानाथ गावात घडली. आरोपी मुलाने आपल्या १६ वर्षांच्या गर्लफ्रेंडला सोशल मीडियावर दुसऱ्या एका मुलासोबत मेसेजवर बोलताना पाहिले होते. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि अल्पवयीन मुलाने मुलीला मारहाण केली. या रागाच्या भरात त्याने घरात ठेवलेला एक जुना देशी कट्टा काढला आणि गर्लफ्रेंडवर गोळी झाडली, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलगी दुसऱ्या गावाची राहणारी होती.(Crime News)
Crime News: गुन्हा लपवण्यासाठी रचला कट
‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, हत्येनंतर घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने या घटनेची माहिती आपला भाऊ आणि काकाला दिली. यानंतर पोलीस आणि लोकांच्या नजरेतून हा भयानक गुन्हा लपवण्यासाठी त्या तिघांनी मिळून मुलीचा मृतदेह पुरला. मात्र, आरोपीच्या काकाने आपल्या एका मित्राला या घटनेबद्दल सांगितल्यामुळे ही घटना उघड झाली आणि तिथून ही बातमी परिसरात पसरली.
Crime News: कसा झाला घटनेचा उलगडा?
जेव्हा मुलीच्या आई-वडिलांपर्यंत ही अफवा पोहोचली, तेव्हा त्यांनी पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलाकडे चौकशी केली असता, या हत्येचे भयानक सत्य समोर आले. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह अजून पुरलेला बाहेर काढायचा बाकी असून, त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) पाठवला जाईल. गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा पोलिसांनी जप्त केला असून, तो मुलाच्या आजोबांचा होता आणि कुटुंबीयांनी तो अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे घरात ठेवला होता.
Crime News: दोन महिन्यांपूर्वी मैत्री, एक महिन्यापासून होते लिव्ह-इनमध्ये
पोलीस तपासात समोर आले आहे की, या दोन्ही अल्पवयीन मुलांची मैत्री साधारण दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच झाली होती. गेल्या एक महिन्यापासून ती मुलगी आरोपी मुलासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. मुलीने तिचे शिक्षण सोडले होते आणि ती आपल्या एका ‘मैत्रिणीसोबत’ राहत असल्याचे खोटे तिने आई-वडिलांना सांगितले होते, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनीही जास्त विचारणा केली नाही. दुसरीकडे, मुलगी मुलासोबत राहत असल्याची माहिती मुलाच्या कुटुंबीयांनाही होती, परंतु त्यांनीही यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता. सध्या कोडीहल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवले असून, या प्रकरणात अजून काही दुवे जोडणे बाकी आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी लोकांचा हलगर्जीपणा होता का, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
Comments are closed.