सुप्रिया सुळेंचा ‘व्हाईस रेस्ट’! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती
नवी दिल्ली : शुक्रवारी नवी दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि लोकसभेत त्या मुद्द्यावर आवाज उठवणार असल्याचं सांगणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या घशाला सूज आल्यामुळे त्यांना पूर्णपणे न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन आठवडे त्या भाषण किंवा मुलाखती देणार नाही. सुप्रिया सुळेंनी स्वतः याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.
येत्या 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घशाचा त्रास सुरू झाल्याने पक्षाची भूमिका मांडण्याची मुख्य जबाबदारी आता दुसऱ्यांवर येऊ शकते.
Supriya Sule Post : नेमकं काय म्हटलंय सुप्रिया सुळे यांनी?
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, “माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्येबाबत मी नुकतीच डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे निदान केले असून, मला पूर्णपणे ‘व्हॉइस रेस्ट’ (आवाजाला पूर्ण विश्रांती) घेण्याचा सल्ला दिला आहे. यावर उपाय म्हणून मी ‘व्हॉइस थेरपी’ घेणार आहे आणि पुढील 1-2 आठवडे भाषणे, मुलाखती व दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला मला देण्यात आला आहे. आपण ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”
नुकतेच डॉ मिलिंद कीर्तने यांना माझा गळा आणि आवाजाबाबत भेटलो. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे निदान केले आहे आणि संपूर्ण आवाज विश्रांतीचा सल्ला दिला आहे. माझी व्हॉईस थेरपी सुरू आहे, आणि मला पुढील १/२ आठवडे भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.…
— सुप्रिया सुळे (@supriya_sule) 18 जुलै 2026
सुप्रिया सुळे On Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात नवी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार वांगचुक यांच्या सोबत असून सोमवारी होणाऱ्या दिल्लीतील मोर्चामध्ये ते सहभागी होतील असा विश्वास सुळे यांनी दिला होता. तसेच या मुद्द्यावर आपला पक्ष संसदेत आवाज उठवेल असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.
सोनम वांगचुक हे आमच्यासाठी महत्त्वाचं असून हे सरकार असंवेदनशील असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. केंद्र सरकारच्या वतीने कुणीतरी येऊन चर्चा करायला हवी होती, पण तसं झालं नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.
दरम्यान, सुप्रिया सुळेंना आता घशाबाबत समस्या उद्भवली आहे. त्यांच्या घशाला थोडी सूज असल्याचं निदान झालं असून पुढील काही दिवस आवाजाला पूर्णपणे विश्रांती द्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन आठवडे आपण भाषण किंवा मुलाखती देणार नाही, असं सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत आपण व्हाईस थेरपी घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ही बातमी वाचा:
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’
Comments are closed.