धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच काढला लहान भावाचा काटा, भावाची पत्नीही गंभीर जखमी
चंद्रपूर क्राईम न्यूज : चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून सख्या मोठ्या भावाकडून लहान भाऊ व त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात लहान भावाचा मृत्यू झाला आहे तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सावली तालुक्यातील डोंगरगाव (मस्के) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
पाथरी पोलीसांकडून तपास सुरु
या हल्ल्यात कुसकु बावणे (वय 45) यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी योगिता बावणे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपी शामराव बावणे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.
बारमध्ये दोन गटांत कोयत्याने हल्ला, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी, थरार सीसीटीव्हीत कैद
लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री एका बारमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे हिंसक रुपांतर झाले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर कोयत्यासह हल्ला केल्याने एक तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यामध्ये हातात कोयते घेऊन एकमेकांवर हल्ला करताना संबंधित दिसत आहेत. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचार सुरु असताना गंभीर जखमी असलेल्या सोपान बीोईने या तरुणाचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर पोलिसांनी तीन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विवेकानंद पोलीस करत आहेत.
Comments are closed.