पिसाळलेला श्वान चावला की माणूसही त्या श्वानाप्रमाणे बोलतो, तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार
रामदास कदमांवर सुनील तटकरे : शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणे बोलतो अशी टीका खोचक टीका तटकरेंनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावे असेही तटकरे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
रामदास कदम यांनी केलेला टीकेचा सुनील तटकरें कडून जोरदार समाचार घेण्यात आला. पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणे बोलतो अशी टीका तटकरेंनी रामदास कदम यांच्यावर केली. एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावे असे म्हणत सुनील तटकरे यांच्या कडून कदम यांना मनोरुग्णाची उपमा दिली आहे. आधीच मर्कट त्यात दारु प्यायले असे म्हणत तटकरे यांच्याकडून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर पलटवार करण्यात आला. रामदास कदम यांना यापुढं भाई म्हणणार नाही. कदम यांच्या वक्तव्यामुळं आई ला दुःख झाल्याने तटकरे अधिक संतापल्याचे पाहायला मिळाले. रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख केल्याने तटकरे संतापले.
जयंत पाटील महायुती सरकारमध्ये सहभागी होऊन अर्थमंत्री होतील का? तटकरे म्हणाले…
जयंत पाटील महायुती सरकारमध्ये सहभागी होऊन अर्थमंत्री होतील या वृत्ताचा सुनील तटकरे यांनी इनकार केला. शरद पवार हे प्रगल्भ नेते आहेत. दोन वेळा सरकार आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’
Comments are closed.