Nail Care : नेल पेंट खरेदी करण्यापूर्वी लेबल वाचायला विसरू नका!
नेल पेंट ही ब्युटी रूटीनचा महत्त्वाचा भाग बनला आहे. वेगवेगळ्या रंगांच्या नेल पेंटमुळे नखांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मात्र, फक्त आकर्षक रंग किंवा ट्रेंडी शेड पाहून नेल पेंट खरेदी करणे पुरेसे नाही. त्यामध्ये वापरण्यात आलेले घटक आणि लेबलवरील माहिती वाचणेही तितकेच महत्वाचे आहे. nail care procedure
काही नेल पेंटमध्ये असे रसायने असतात, ज्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास नखे कमकुवत होणे, कोरडी पडणे, तुटणे किंवा त्वचेची अॅलर्जी होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नेल पेंट खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.
लेबल नक्की वाचा
बाजारात अनेक प्रकारचे नेल पेंट उपलब्ध आहेत. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी त्यावरील लेबल आणि घटकांची माहिती नीट वाचा. जर बाटलीवर 5-Free, 7-Free, 9-Free, 10-Free किंवा Free From असे लिहिलेले असेल, तर याचा अर्थ त्या नेल पेंटमध्ये काही हानिकारक रसायने वापरण्यात आलेली नाहीत. तसेच शक्य असल्यास Water-Based किंवा Kids Safe असे लेबल असलेले पर्याय निवडावेत. हे नखांसाठी तुलनेने अधिक सुरक्षित मानले जातात.
‘या’ रसायनांपासून सावधान!
नेल पेंटमधील घटक तपासताना खालील रसायने आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. फॉर्मल्डिहाइड, टोल्युईन, डीबीपी, कॅम्फर, फॉर्मल्डिहाइड रेझिन, झायलिन, इथाइल टोसिलामाइड या रसायनांचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास काहींना अॅलर्जी, खाज, जळजळ, नखे कमकुवत होणे किंवा इतर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
‘5-Free’ किंवा ‘7-Free’ म्हणजे काय?
नेल पेंटवर 5-Free किंवा 7-Free असा उल्लेख असल्यास, त्यामध्ये सर्वाधिक हानिकारक मानल्या जाणाऱ्या पाच किंवा सात रसायनांचा वापर केलेला नसतो.
हल्ली बाजारात 9-Free आणि 10-Free नेल पेंटही उपलब्ध आहेत. यामध्ये आणखी जास्त हानिकारक रसायने टाळली जातात, त्यामुळे हे पर्याय अधिक सुरक्षित मानले जातात.
म्हणूनच, सुंदर नखे दिसण्यासाठी फक्त आकर्षक रंग निवडणे पुरेसे नाही. सुरक्षित घटक असलेली, दर्जेदार आणि लेबल तपासून घेतलेली नेल पेंट वापरल्यास नखे दीर्घकाळ निरोगी आणि सुंदर राहण्यास मदत होते.
Comments are closed.