घर खरेदी करण्यापूर्वी काय तपासावे ?

आपलं स्वत:च्या हक्काचं घर असावं असं स्वप्न सगळ्यांचच असतं. पण मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये घरांच्या किंमती गगनाला पोहचल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी घर घेणं हा मोठा टास्क झाला आहे.  त्यातच घर खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर देखील घर खरेदीत आकर्षक ऑफर, मोठ्या सवलती किंवा “मर्यादित कालावधीची ऑफर”अशा जाहीराती देतात.  यामुळे या जाहीराती वाचून घाईत निर्णय घेऊ नका.  घर विकत घेणं हा तुमच्याच नाही तर तुमच्या कुटुंबासाठीही महत्वाचा निर्णय आहे. तो घेताना  सर्व कागदपत्रांची पडताळणी करा. कारण घर खरेदीमध्ये फसवणूक होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. यामुळे आयुष्यभर कष्ट करुन कमावलेल्या पैशात घर खरेदी करताना नेमके कोणते कागदपत्रं तपासावेत काय काळजी घ्यावी ते नागरिकांना माहीत असणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी काय करावे ते बघूया.

रेरा RERA नोंदणी तपासा – प्रकल्प महाराष्ट्रात असेल तर तो RERA मध्ये नोंदणीकृत आहे का ते तपासा. यामुळे प्रकल्पाची कायदेशीर माहिती, पूर्ण होण्याची तारीख आणि तक्रार निवारणाची सुविधा मिळते.

बिल्डरची विश्वासार्हता तपासा – बिल्डरचा पूर्वीचा इतिहास, वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचा रेकॉर्ड, ग्राहकांची मते आणि आधीचे प्रकल्प पाहा.

जमिनीचे कागदपत्र तपासा – जमिनीचा मालकी हक्क (Title), NA (Non-Agricultural) परवानगी, विकास करार (Development Agreement) आणि इतर कायदेशीर कागदपत्रे वकिलामार्फत तपासून घ्या.

सर्व सरकारी मंजुरी आहेत का ते पाहा – Building Plan Approval, Commencement Certificate (CC), पर्यावरण मंजुरी (लागू असल्यास) आणि इतर आवश्यक परवानग्या तपासा.

Agreement काळजीपूर्वक वाचा – कार्पेट एरिया, ताबा मिळण्याची तारीख, विलंब झाल्यास नुकसानभरपाई, देखभाल शुल्क आणि इतर अटी समजून घ्या.

एकूण किंमत जाणून घ्या – बेस प्राइससोबत GST, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, पार्किंग, क्लब हाऊस, मेंटेनन्स डिपॉझिट आणि इतर लपविलेले खर्च विचारून घ्या.

बँकेची मंजुरी तपासा – नामांकित बँकांनी प्रकल्पाला होम लोनसाठी मंजुरी दिली आहे का ते पाहा.

लोकेशन आणि भविष्यातील विकास – शाळा, रुग्णालय, रेल्वे/मेट्रो, रस्ते, पाणीपुरवठा आणि परिसरातील भविष्यातील विकास तपासा.

बांधकामाचा दर्जा – वापरलेले साहित्य, सुरक्षा व्यवस्था, लिफ्ट, अग्निसुरक्षा आणि इतर सुविधा तपासा.

ताबा मिळण्याची वास्तववादी तारीख – प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख आणि बांधकामाची सध्याची प्रगती पाहा. केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवू नका.

सोसायटी आणि मेंटेनन्स – भविष्यातील मासिक मेंटेनन्स, सोसायटीची स्थापना आणि सुविधांचे व्यवस्थापन कसे होणार याची माहिती घ्या.

कायदेशीर सल्ला घ्या – कोणतेही दस्तऐवज किंवा करार साइन करण्यापूर्वी अनुभवी मालमत्ता वकिलाचा सल्ला घ्या.

Comments are closed.