पोलिसांनी काल विद्यार्थ्यांना संसदेपर्यंत पोहोचू दिलं नाही, आज राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच
काँग्रेस नेते पंतप्रधान निवासाबाहेर धरणे आंदोलनाला बसून मोठ्या आवाजात ‘पंतप्रधान राजीनामा द्या’ आणि ‘नरेंद्र मोदी डाउन-डाउन’च्या घोषणा देत आहेत. धरणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस खासदार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी आहेत. दरम्यान, काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे पंतप्रधान निवासाबाहेर जमिनीवर झोपून विरोध दर्शवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांसह खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धरणे आंदोलन करणारे अनेक काँग्रेस नेते ताब्यात घेतले आहेत. पंतप्रधान निवासाबाहेर धरणे आंदोलन करणारे काँग्रेस खासदार चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून येत आहे.
ही एक लांब लढाई आहे, ती आम्ही लढूही आणि जिंकूही – अभिजित दीपके
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले, “आमच्या मागण्या आधीपासूनच त्याच आहेत, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पीडितांच्या कुटुंबांना १ कोटी रुपयांची भरपाई आणि सोनम वांगचुक यांच्यासह सर्व आंदोलकांची तात्काळ सुटका. मी सर्वांना सांगू इच्छितो की ही एक मोठी लढाई आहे, पण आपण ती फक्त लढणारच नाही तर जिंकणारसुद्धा.” जेव्हा त्यांना विचारण्यात आले की ते सरकारशी पुन्हा चर्चा करणार का? यावर दीपके म्हणाले, “त्यांना इथे (जंतरमंतरवर) यावे लागेल, आम्ही आता त्यांच्याकडे जाणार नाही…”
काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे – मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांचे अधिकार आणि त्यांच्या रास्त मागण्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आम्ही पंतप्रधान निवासाबाहेर धरण आंदोलनाला बसलो आहोत. सरकारला लाठीचार आणि बळप्रयोगाचे उत्तर द्यावेच लागेल.”
Comments are closed.