पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इन
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या घरी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी जंतरमंतरवर (Jantar Mantar Protest) सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जवळपास तीन तास राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होते. सोमवारीच संसद भवनाच्या परिसरात दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट लाठीमार केला होता. त्यानंतर या परिसरातील सुरक्षा कमालीची वाढवण्यात आली होती. मात्र, असे असतानाही राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देत पंतप्रधान मोदी यांचे निवासस्थान कसे गाठले, याची सुरस कहाणी आता समोर आली आहे. (Rahul Gandhi Protest outside पीएम मोदी घर)
राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या सिक्रेट प्लॅनची माहिती कोणाला दिली नव्हती. काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदारांना शेवटच्या क्षणापर्यंत आपण पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत, याची कल्पना नव्हती. खासदारांना या प्लॅनची माहिती असल्यास ही माहिती बाहेर जाऊन पोलीस यंत्रणा सावध होण्याची शक्यता होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या निवड नेत्यांनाच या प्लॅनबद्दल कल्पना होती. पंतप्रधान मोदी यांचे 7 लोककल्याण मार्ग हे निवासस्थान मल्लिकार्जून खरगे यांच्या 10 राजाजी मार्ग या निवासस्थानापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. काँग्रेसच्या खासदारांना आपल्याला मल्लिकार्जून खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जायचे आहे, असे सांगण्यात आले होते. काँग्रेसचे हे 25 खासदार खरगेंच्या घरी होते तेव्हाही त्यांना याची कल्पना नव्हती.
मल्लिकार्जून खरगे यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांना सांगण्यात आले की, कोणताही प्रश्न न विचारता राहुल गांधी यांच्या ताफ्याच्या मागे चालत जा. त्यानुसार काँग्रेस खासदार चालतचालत पंतप्रधान मोदी यांच्या घरापर्यंत पोहोचले. तेव्हा राहुल गांधी अचानक सगळ्या खासदारांना म्हणाले की, आपल्याला इथेच बसायचे आहे. त्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्या घराबाहेर ठिय्या देत घोषणबाजी सुरु केली. थोड्याचवेळात ही बातमी सर्वदूर पसरली आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी याठिकाणी पोहोचले. त्यापाठोपाठ काँग्रेसचे आणखी काही नेते, कार्यकर्ते याठिकाणी आले. त्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादवही या आंदोलनात सामील झाले. सगळ्यांना गुंगारा देऊन राहुल गांधी यांनी इतका मोठा जमाव घेऊन पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन सुरु केल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले होते. राहुल गांधी तीन तास याठिकाणी ठिय्या देऊन बसले होते. दिल्ली पोलिसांनी ज्याप्रमाणे अमानुष पद्धतीने जंतरमंतरवरील आंदोलकांना पिटाळून लावले, तसा प्रकार राहुल गांधी यांच्याबाबत करणे शक्य नव्हते. त्यासाठी दरम्यानच्या काळात मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींची समजूत काढण्यासाठी आले होते. मात्र, राहुल गांधी ऐकायला तयार नाहीत, हे लक्षात आल्यावर ते निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत राहुल गांधी यांना इथून हटवले. मात्र, तोपर्यंत बराच वेळ झाला होता. थेट पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर आंदोलन करुन राहुल गांधी यांनी खूप मोठा डाव यशस्वी करुन दाखवला.
आणखी वाचा
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.