पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? : कंगना रनौत
कंगना राणौत राहुल गांधींच्या निषेधार्थ मु पीएम मोदी निवासस्थान: ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं (Cockroach Janata Party) आंदोलन आता आणखी तीव्र झालं आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभरात पडत आहेत. एकीकडे विरोधी पक्ष विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेबाबत सरकारला जाब विचारत असताना, दुसरीकडे काँग्रेसनं पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) घराबाहेर ज्या पद्धतीनं आंदोलन केलं, त्यावर भाजप (BJP) नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसनं (Congress) पंतप्रधान निवासस्थानाजवळ केलेल्या धरणे आंदोलनावरुन भाजप खासदार कंगना रनौत (BJP MP Kangana Ranaut) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
कंगना रनौत (Kangana Ranaut यांनी काँग्रेसच्या आंदोलनाला सुरक्षेतील मोठी त्रुटी (Security Breach) असल्याचं म्हटलंय. कंगना रनौत यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की, जेव्हा आंदोलनासाठी ‘जंतर-मंतर’ हे ठिकाण निश्चित करण्यात आलं होतं, तर, राहुल गांधी पंतप्रधान निवासस्थानाच्या दिशेनं का गेले?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेमकं काय म्हणाल्या? (Kangana Ranaut On CJP Protest)
माध्यमांशी बोलताना कंगना रनौत म्हणाल्या की, “ही सुरक्षेतील त्रुटी होती. राहुल गांधींनी आंदोलकांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे नेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जंतर-मंतरवर आधीच आंदोलन सुरू असताना, त्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन का करायचं होतं? आमचं सरकार सतत संवाद साधतंय…”
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याच्या राहुल गांधींच्या मागणीवरही कंगना रनौत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कंगना रनौत म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. मग त्यांनी राजीनामा का द्यावा?”
काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन का केलं?
मंगळवारी दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानाजवळ काँग्रेसनं आंदोलन केलं. या निदर्शनांमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान, राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असा आग्रह धरला. निदर्शनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
राहुल गांधी आणि इतर नेत्यांना तिथून हटवण्यासाठी जेव्हा पोलीस आले, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. पोलीस जवळ येत असताना राहुल गांधी जमिनीवर झोपले, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह इतर नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं. काही तासांनंतर सर्व नेत्यांची सुटका करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Comments are closed.