विद्यार्थी आंदोलकांसोबत झालेल्या क्रूर कारवाईमुळे खूप त्रास झाला… जाॅनी लिव्हर स्पष्टच बोलले
ख्यातनाम विनोदी अभिनेता जाॅनी लिव्हर यांनी आता जंतरमंतर येथील आंदोलनावर आता मौन सोडले आहे. जंतरमंतर येथील आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारावरून आता सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक अजूनही ठाम आहेत. त्याकरता काॅक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलक एकत्र जमले आहेत. या आंदोलकांवर झालेल्या क्रूर मारहानीसंदर्भात आता विविध स्तरातून प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत.
जाॅनी लिव्हर यासंदर्भात म्हणाले की, दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून त्रास होतोय. याकरता सरकारने किमान विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्या. आंदोलन करणाऱ्या मुलांचं भविष्य उज्जवल व्हावे हीच इच्छा आहे असे ते म्हणाले. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
काॅक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनामध्ये, अभिनेत्री शबाना आझमी, प्रकाश राज, नसीरूद्दीन शाह अशा विविध मान्यवर सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. जंतरमंतरवर झालेल्या अमानुष लाठीमारानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. गायक दिलजित दोसांज, अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेश यांनीही विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला आहे.
Comments are closed.