मीनाक्षींची दमदार एन्ट्री,’हिरो’ची आयकॉनिक जोडी 40 वर्षांनंतर पुन्हा दिसणार ऑनस्क्रीन – Tezzbuzz

मीनाक्षी शेषाद्री हे एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी 80 आणि 90 च्या दशकात अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध तिने केले होते आणि आता बऱ्याच वर्षानंतर ती पुन्हा अभिनयात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांना मुंबईत परतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. त्या लवकरच प्राईम व्हिडिओच्या आगामी वेब सीरिज ‘नानावटी व्हर्सेस नानावटी’मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या सिरीजचे दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माते विपुल शाह यांनी केले आहे. विशेष म्हणजे या सिरीज मध्ये 1983 च्या बॉलीवूड चित्रपटातील सुपरहिट जोडी म्हणजे मीनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफ ही जोडी यामध्ये दिसणार आहे. हे दोघेजण जवळपास 40 वर्षानंतर पुन्हा एकत्र ऑन स्क्रीन पाहायला मिळतील.

कोर्टरूम ड्रामाचे दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माते विपुल शाह यांनी केले आहे. सुभाष घई यांच्या 1983 सालच्या ‘नायक‘ (hiro) या चित्रपटाने मीनाक्षीला रातोरात स्टार बनवले. त्यात तिने जॅकी श्रॉफसोबत मुख्य भूमिका साकारली होती. आता, चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर, या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत. वृतानुसार सध्या या सीरीजचे चित्रकरण मुंबई येथे सुरु आहे. मात्र कधी ओटीटी वर येईल यांची अद्याप माहीती समोर आली नाही. मात्र लवकरच असे मानले जाते की, चित्रीकरणाचा महत्त्वपूर्ण भाग पूर्ण झाल्यानंतरच निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म औपचारिक घोषणा करतील.

‘जना नायकन’ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये उडवला धुराळा; ७ लाख तिकिटे विकून झाला इतक्या कोटींचा गल्ला

Comments are closed.