Smart TV खरेदी करताय? पैसे खर्च करण्यापूर्वी हे फीचर्स नक्की तपासा

हल्ली Smart TV हा केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेला नाही, तर तो घरातील एंटरटेनमेंट हब बनला आहे. ऑनलाइन OTT प्लॅटफॉर्म, गेमिंग, YouTube, व्हिडिओ कॉल्स आणि स्क्रीन कास्टिंग यामुळे टीव्हीची गरज आणि वापर दोन्ही बदलले आहेत. मात्र, Smart TV खरेदी करताना अनेकजण फक्त स्क्रीनचा आकार किंवा किंमत पाहून निर्णय घेतात. पण उत्तम अनुभवासाठी काही महत्त्वाची फीचर्स तपासणं तितकंच महत्वाचं आहे. जाणून घेऊयात ते फीचर्स नेमके कोणते आहेत.

4K रिझोल्युशनल
टीव्हीमध्ये स्पष्ट, शार्प आणि अधिक ईन्हान्सिव्ह चित्रांचा अनुभव हवा असेल, तर 4K Ultra HD रिझोल्युशन असलेला टीव्ही निवडा. विशेषतः OTT कंटेंट आणि मोठ्या स्क्रीनवर चित्राची गुणवत्ता अधिक चांगली दिसते.

स्मार्ट ऑपरेटिंग सिस्टम
Google TV किंवा इतर आधुनिक Smart OS असलेला टीव्ही निवडल्यास विविध Apps सहज वापरता येतात. Voice Search, वैयक्तिक कंटेंटची पूर्तता सोपा इंटरफेस यामुळे वापर अधिक सुलभ होतो.

HDR समर्थन
HDR10 किंवा Dolby Vision सपोर्ट असलेला टीव्ही निवडल्यास रंग अधिक नैसर्गिक, उजळ आणि कॉन्ट्रास्ट अधिक प्रभावी दिसतो. चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याचा अनुभव अधिक दर्जेदार होतो.

120Hz रिफ्रेश दर
जर तुम्हाला Sports, Action Movies किंवा Gaming आवडत असेल, तर 120Hz Refresh Rate असलेला टीव्ही अधिक योग्य ठरतो. यामुळे वेगवान दृश्यांमध्ये स्क्रीन अधिक स्मूथ दिसते आणि मोशन ब्लर कमी जाणवतो

डॉल्बी ॲटमॉस ऑडिओ
वेगळा साऊंडबार न वापरताही Dolby Atmos सपोर्ट असलेल्या टीव्हीमध्ये अधिक स्पष्ट, प्रभावी आणि सराउंड साऊंडचा अनुभव मिळू शकतो.

कनेक्टिव्हीटी फीचर्स
टीव्हीमध्ये Dual-Band Wi-Fi, Bluetooth आणि किमान 3 HDMI Ports असणे फायदेशीर ठरते. यामुळे Gaming Console, Soundbar, Set-top Box किंवा इतर डिव्हाइस सहज जोडता येतात.

AI Features आणि Voice Control
AI Picture Optimisation, Voice Assistant, Screen Casting आणि Smart Recommendations यांसारखी आधुनिक फीचर्स दैनंदिन वापर अधिक सोपा आणि स्मार्ट बनवतात.

Comments are closed.