कोकण, पुणे, नाशिकसाठी इशारा! पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पावसाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. पावसामुळे पूर, भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. येत्या 24 तासांत कोकण, पुणेसह नाशिकमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या अंतर्गत भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

IMD मॉडेलनुसार, पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर कोकण, पुणे, रायगड आणि नाशिकमधील घाट भागांसह काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा जुलैमध्ये दाखल झाला. जुलै सुरवातीला पावसाने मुंबई, पुणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला होता. यामुळे अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले होते. जुलैच्य सुरवातीला झोडपून काढणारा पाऊस नंतर 10 ते 12 दिवस गायब झाला. त्यानंतर 19 जुलै रोजी पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली.

Comments are closed.