तरूणांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीकर उद्या रस्त्यावर उतरणार, मंडणगड ते राजापूर पासून नागरिक सहभागी होणार
नीट परीक्षा पेपरफुटीनंतर देशातील तरूणांनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले. तरूणांचे हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने संसदेबाहेर जमलेल्या आंदोलकांवर अत्याचार केला आहे.सरकारच्या या धोरणाचा निषेध करून तरूणांच्या लढ्याला पाठींबा देण्यासाठी उद्या गुरूवारी रत्नागिरीत होणाऱ्या मोर्चात मंडणगड ते राजापूर पर्यंतचे नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नौसीन काझी यांनी पत्रकारांना दिली.शिव शाहू फुले आंबेडकर विचारमंचच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
उद्या होणाऱ्या मोर्चाचे संयोजक नौसीन काझी यांनी सांगितले की, सोनम वायचुंग यांना उपोषण स्थळावरून ज्या पद्धतीने सरकारने उचलले.संसदेबाहेर जमलेल्या आंदोलकांवर ज्या पध्दतीने पोलिसांनी लाठीमार केला.महिलांवर ज्या अत्याचार केला त्याविषयी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.उद्या गुरूवारी 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.या मोर्चात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील नागरिक,सर्व राजकीय कार्यकर्ते,विद्यार्थी सहभागी होणार आहेत असे नौसीन काझी यांनी सांगितले.पुढे ते म्हणाले की, नीट पेपर फुटीमुळे असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी तरूणांची मागणी होती त्या मागणीकडे दुर्लक्ष करून सरकारने पोलीस बळाचा वापर करून तरूणांवर जो अत्याचार केला आहे तो निंदनीय असून त्याचा निषेध आम्ही उद्याच्या मोर्चात करणार असल्याचे नौसीन काझी यांनी सांगितले.
Comments are closed.