अचानक अंधुक दिसतं? असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण

हल्ली अनेकजणांना अचानक अंधुक दिसण्याची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. सततचा स्क्रीन वापर, वाढतं वाय आणि डोळ्यांवर येणारा ताण किंवा चष्म्याचा नंबर वाढणं यामुळे ही समस्या वाढत आहे. अनेकजण या समस्येला सामान्य समजून दुर्लक्ष करत आहे पण प्रत्येकवेळी असं घडणं हे आरोग्याच्यादृष्टीने योग्य नाही. काहीवेळी अचानक अंधुक दिसणं शरीरातील काही आजारांचे लक्षण असू शकते. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नॅशनल आय इंस्टीट्यूट (NEI) नुसार, दृष्टी अचानक अंधुक होत असेल आणि यासोबतच डोळ्यांत वेदना, प्रकाशाचे झोत, डोळ्यासमोर तरंगणारे कण किंवा दृष्टीमध्ये इतर बदल जाणवून येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

पुढील आजारांचा धोका –

मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर अचानक खूप वाढल्यास किंवा कमी झाल्यास डोळ्यांच्या लेन्सचा आकार बदलतो आणि अंधुक दिसायला सुरूवात होते.

डोळ्यांमधील अंतर्गत दाब वाढल्यास काचबिंदूची समस्या निर्माण होते. यात योग्य वेळी उपचार न झाल्यास दृष्टी कायमची जाऊ शकते.

डोळ्याचा पडदा म्हणजेच रेटिना सरकल्यास किंवा त्याला इजा झाल्यास अचानक अंधुक दिसते.

तासनतास मोबाईल, लॅपटॉपची स्क्रीन पाहिल्यास डोळ्यांवर प्रचंड ताण येतो आणि कोरड्या डोळ्यांची समस्या सुरू होते.

काय काळजी घ्यावी?

अचानक अंधुक दिसू लागल्यास डोळे चोळणे पूर्णपणे टाळा. तात्काळ गॉगल किंवा आय-शिल्ड वापरा आणि एकाच वेळी जास्त ताण देणे बंद करा.

डोळ्यांना नेहमी निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळे आणि जीवनसत्त्वे यांनी समृद्ध असलेला संतुलित आहाराचा आपल्या जेवणात समावेश करा.

हेही वाचा – महिनाभर फक्त सलाड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Comments are closed.