छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज दरम्यान आणखी दोन आषाढी ‘वन-वे’ विशेष गाड्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज दरम्यान आणखी दोन आषाढी ‘वन-वे’ विशेष गाड्या चालवणार आहे. दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर थांबे देण्यात येतील.

गाडी क्रमांक 01183 ‘वन-वे’ विशेष गाडी 25 जुलै 2026 रोजी दुपारी 3.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता मिरजला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01181 ‘वन-वे’ विशेष गाडी दिनांक 26 जुलै 2026 रोजी 00.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.25 वाजता मिरजला पोहोचेल.

आषाढी विशेष गाडी क्रमांक 01183 आणि गाडी क्रमांक 01181 चे आरक्षण 23 जुलै 2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होईल. भाविक तिकीट आरक्षणासाठी ‘रेलवन‘ ॲप देखील डाउनलोड करू शकतात.

Comments are closed.